अमरावती – दुर्वास रोकडे
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा दि. 14, 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे: बुधवार, दि. 14 ऑगस्ट रोजी नागपूर येथून रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व मुक्काम.
गुरूवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.55 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून वाहनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता विभागीय कार्यालय येथे आगमन व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 11 वाजता प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव येथे आगमन व सन 2024-25 राजभाजी महोत्सव समारंभास उपस्थिती.
दुपारी 12.10 वाजता वलगाव येथून वाहनाने कुरलपुर्णा, ता. चांदूरबाजारकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था, निवासी मूकबधीर विद्यालय टोंगलापूर फाटा मासोद, पो. कुरलपूर्णा, ता. चांदुरबाजार येथे आगमन व आमदार बच्चू कडू यांची सदिच्छा भेट. दुपारी 4.30 वाजता आमझरी पर्यटन संकुल, आमझरी ता. चिखलदरा येथे भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक-युवतींशी चर्चा. सायंकाळी 5.30 वाजता प्रकाश होम स्टे, खटकाली, ता. चिखलदरा येथे आगमन व सदिच्छा भेट. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथून वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता चिखलदरा, कुंभी बल्ला, भिमकुंड येथे आगमन व गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील निसर्गानुभव मचाणीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 10 वाजता भिमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
सोयीनुसार चिखलदरा येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुल लोकार्पण व विविध क्रीडा सुविधा भुमिपूजन समारंभास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.