मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत आज दिनांक १०/८/२०२४ शनिवार रोजी सकाळी ९ वाजता तिरंगा यात्रा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग येथून करण्यात आली मा. आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
रॅली मध्ये मा. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार , तहसीलदार शिल्पा बोबडे , प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅली मध्ये सहभागी होऊन रॅलीला संबोधित केले. रॅली मध्ये नायब तहसिलदार उमेश बन्सोड, भारत जेठवानी माजी नगरसेवक, राहुल गुल्हाने , चंदन अग्रवाल , विलास वानखडे यांनी आपला सहभाग नोंदविला. तिरंगा यात्रा रॅलीचा समारोप नगर परिषद कार्यालय येथे करण्यात आला.
यावेळी मुर्तिजापूर शहरातील प्रत्येक नागरिकाने १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकविन्याचे आवाहन मा आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी केले त्याकरीता संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने एक झाड व एक तिरंगा ध्वज वितरण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तर मा. संदिपकुमार अपार उपविभागीय अधिकारी यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण करून दिली व दिनांक ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिरंगा ध्वज घेऊन सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढून सदर फोटो हा harghartiranga.com या वेबसाईटवर जास्तीत जास्त नागरिकांनी अपलोड करण्याचे आवाहन मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी केले. समारोप स्थळी स्वातंत्र्याचा संदेश लिहून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.सदर रॅली मध्ये मुर्तिजापूर शहरातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, तहसील व नगर परिषद कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यक्रमांचे संचालन राजेश भुगुल सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अमोल बेलोटे उपमुख्याधिकारी, सुभाष म्हैसने प्रशासन अधिकारी यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय इसाळकर , विजय लकडे आरोग्य निरीक्षक, विजय कोरडे , केतन चींचमलातपुरे, विलास वनस्कार , विलास ठाकरे , नितीन शिंगणे यांनी सहकार्य केले.