Sunday, November 17, 2024
Homeराज्यतहसिल कार्यालय रामटेक येथे “महसुल जन संवाद“...

तहसिल कार्यालय रामटेक येथे “महसुल जन संवाद“…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक 30/7/2024 अन्वये दिनांक 1 ऑगष्ट 2024 ते 15 ऑगष्ट 2024 या कालावधीत महसुल पंधरवडा साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्या अनुषंगाने 8 ऑगष्ट 2024 रोजी तहसिल कार्यालय रामटेक येथे “ महसुल जन संवाद “ तहसिल कार्यालय रामटेक येथे महसुल अदालत व फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर फेरफार अदालत मधे प्रलंबित फेरफार निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रलंबित महसुल प्रकणे, सलोखा योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तसेच दिनांक 9 ऑगष्ट 2024 रोजी “ महसुल ई प्रणाली “ कार्यक्रमा अंतर्गत तहसिल कार्यालय रामटेक येथे ई पंचनामे करण्याबाबत सर्व तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले. तसेच – ई चावडी- अचुक जमीन महसुल मागणी निश्चित करणे व ऑनलाईन जमीन महसुल भरणे इत्यादीबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सर्व तलाठयांना मार्गदर्शन करण्यात आले.

त्यावेळी मा रमेश कोळपे, तहसिलदार रामटेक यांनी ई पंचनामे अचुक पध्दतीने करण्याबाबत सविस्तर व ई चावडी अंतर्गत जमीन महसुलाची मागणी निश्चिती करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत नावामध्ये हस्तदोष/ तांत्रीक दोष बाबत कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. ई फेरफार बाबत प्राप्त तक्रारी विहित मुदतीत निकाली काढणे, ई हक्क प्रणाली, महसुल विभागाच्या उपलब्ध ऑनलाईन सुविधा इत्यादीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

आपले सरकार पोर्टल वर प्राप्त होणा-या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमांत श्री. योगेश राऊत, तालुका कृषी अधिकारी रामटेक, श्री. भोजराज बडवाईक नायब तहसिलदार रामटेक, श्रीमती सारीका धा्त्रक नायब तहसिलदार रामटेक, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: