Sunday, December 22, 2024
Homeराज्य११ ऑगस्ट रोजी श्री सीतारामदास महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी...

११ ऑगस्ट रोजी श्री सीतारामदास महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी…

रामटेक – राजु कापसे

श्री सीतारामदास महाराज अंबाला यांची 55 वी पुण्यतिथी श्रावण शुक्ल सप्तमीला 11 ऑगस्ट रोजी श्री भगवान लक्ष्मीनारायण मंदिर राघव कुंड गुंफा खाक चौक अंबाला येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. सकाळी 6.30 वाजता पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक, सकाळी 9 वाजल्यापासून हवन, आरती व दुपारी महाप्रसाद होईल.

श्री सीतारामदास महाराज हे थोर संत होते. ते राघव कुंड गुफ़ा खाक चौक अंबाला येथे राहत होता. त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही राहत होते. श्री सीतारामदास महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामटेक येथे 40 हजार चौरस फुटाचे सुसज्ज योगीराज रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी बांधण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील मंडला आणि अमरकंटक येथे लक्ष्मीनारायण मंदिर राघव कुंड गुफ़ा व आश्रम, अंबालासारखीच बांधण्यात आली आहे. स्वामीही तेथे काही दिवस राहिले. लोकांच्या सेवेसाठी मंडला आणि अमरकंटक येथेही रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत. लक्ष्मीनारायण मंदिर आणि राघव गुंफेत दर गुरुवारी भजन आणि सत्संग होतात. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे नारायण अग्रवाल, एड. संजीव खंडेलवाल, पुरुषोत्तम चोपकर सहित आदींनी केले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: