अमरावती – दुर्वास रोकडे
सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर (https://maharashtra.gov.in) विद्यार्थ्यांनी विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना आदी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.
माहिती व तंत्रज्ञान विभागासमार्फत सन 2024-25 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यानुषंगाने वर्ष 2024-25 करीता महाडीबीटीच्या संकेतस्थळावर अनुसूचित जातीच्या प्रर्वगातील विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्ती योजनांचे नवीन व नुतणीकरणाचे अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यवाही संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयाने करावयाची आहे. त्यानुसार संबंधितांनी विहीत वेळेत ही कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्री. वारे यांनी केले आहे.