अमरावती विधानसभा मतदारसंघ हा यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेना गटाला सोडणार असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले असून या मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवार देणार असल्याचे समजते मतदार संघात बर्याचपैकी हिंदी भाषिक आहेत. पैकी सिंधी समाज हा बहुसंख्य असून यावेळी सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याचे समजते तर सिंधी समाजाचे समाजसेवक नानकराम नेभनानी शिंदे गटाचे प्रबळ दावेदार मानले जातात तर दुसरीकडे विद्यमान आमदार सुलभाताई खोडके ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी मागण्याच्या तयारीत असल्याचं समजते त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यामुळे पेच निर्माण होणार असल्याचे सध्या दिसत आहे.
यापूर्वी भाजप-सेने युतीमध्येही अमरावतीची जागा भाजपने लढवली होती त्यामुळे या जागेसाठी भाजप ठाम राहणार आहे तसेच भाजपकडून अनेक नाव चर्चेत आहेत त्यापैकी एक नाव माजी पालकमंत्री प्रवीण जी पोटे यांचे नाव समोर येत आहे प्रवीण पोटे यांनी विधान परिषदेमध्ये मला रस नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं त्यामुळे यंदा विधानसभा लढण्याच्या तयारीत असल्याचेही समजते…
मुर्तीजापुर शहराचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक नानक राम नेभनानी यांचं महायुतीतील घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटातून नाव समोर येत आहे सिंधी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे ते गेल्या ४५ वर्षापासून राजकारणात आहेत विशेष म्हणजे ते गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मंत्रालयातील जनहिताचे काम करतात. अमरावती विधानसभेत ओबीसी, मराठा मतदारांबरोबर बौद्ध मुस्लिम हाही मतदार निर्णायक समजला जातो. या सर्व समाजाला आपल्या स्वभावाच्या बळावर आपल्याकडे वळवू शकतो.
अमरावतीच्या लोकसभेमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी बाजी मारली जरी असली तरी विधानसभेमध्ये चित्र वेगळे असू शकते यावेळी एकनाथ शिंदे यांचे खास जवळचे मानले जाणारे नानकराम नेभणानी अत्यंत दयाळू स्वभावाचे कोणाच्याही मदतीला धावून येण्यासाठी तत्पर असलेले अशी त्यांची ओळख आहे जर त्यांना उमेदवार मिळाली तर ते मतदार संघातील मुस्लिम, बौद्ध मतदारांना आपल्याकडे करू शकतात त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघात निवडून येण्याची संधी आहे.