रामटेक – राजू कापसे
रामधाम (तीर्थ) मनसर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) नागपुर व नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जागृती लोकसंचालित साधन केंद्र, रामटेक तर्फे मा. पार्वती सभागृह, रामधाम तीर्थ मनसर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा व (माविम) महिला बचत गटातील महिलांचा भव्य महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उदघाटन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री. सुनीलजी केदार साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांनी केले.
यांनी आपल्या भाषणात सांगितले की रामटेक को ऑपरेटिव्ह कृषी उद्योग मार्फत महिलांना सशक्त बनविण्यासाठी महिला बचत गटांना, युवक व युवतीना कुटीर उद्योग स्थापित करून रोजगाराची संधी प्राप्त करून देऊन दैनंदिन उपयोगाचे पदार्थ बनविण्याकरिता मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करण्यात येईल, कुटीर उद्योग सुरु करण्याकरिता आर्थिक सवलती बाबत मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल. इच्छुक बचत गटांना उद्योग सुरु करण्याकरिता उद्योग सामग्री संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, महिला बचत गट द्वारा निर्मित वस्तुंना पुणे, नागपूर, मुंबई ई ठिकाणी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल.
व त्यांचा या स्वरोजगारातून रामटेक विधानसभेतील प्रत्येक महिलेजवळ त्यांचा स्वतःचा मालकीची ऍक्टिवा गाडी राहील असा विश्वास श्री. चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित सर्व महिलांना दिला. या महिला मेळाव्यात हजारो महिलांची उपस्थिती होती या मेळाव्यात महिलांनी त्यांच्यात असेलेलं सुप्त गुणांचा सादरीकरण केले,(नृत्य, गीत वक्तृत्व )या मेळाव्यात महिला बचत गटाकडून विविध प्रकारचे वस्तूची प्रदर्शन लावण्यात आले होते यावेळी रामटेक येथील शेतकरी उत्पादक कंपनी च्या संचालिका सौ दुर्गाताई लोंढे व कुल्पी उद्योजका सौ पल्लवी भोयर यांचा मा माजी मंत्री सुनिलबाबू केदार साहेब व श्री चंद्रपाल चौकसे साहेब पर्यटक मित्र यांचा हस्ते कुशल उद्योजका म्हणून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन खुशाल कापसे सर यांनी केले.
यावेळी श्री. दयारामजी राय (राष्ट्रीय अध्यक्ष, सरपंच संघटन), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ मनसर), मा.सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा, जी.प. नागपुर), श्री. सचिनजी किरपान (सभापती कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. अशोकजी चिखले (सभापती कृ.उ.बा.स. पारशिवनी), श्री. सुनिलजी रावत, श्री. दुधरामजी सव्वालाखे (सदस्य, जी.प. नागपुर), श्री. योगेशजी देशमुख (सदस्य, जी.प. नागपुर), सौ. कलाताई ठाकरे (सदस्य, पं.स. रामटेक), सौ. अस्मिताताई बिरणवार (सदस्य, पं.स. रामटेक),
सौ. साधनाताई दर्डेमल (माजी पं.स. सदस्या), शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष रामटेक), श्री. दीपक वर्मा, श्री. दिलीपजी कोलते, श्री. संदीप गजभिये, श्री. हेमंत जैन, श्री. बन्सीलालजी बमनोटे, सौ. भारती गायकवाड ( ब्लॉक मॅनेजर मावीम), श्री. ललित चामट (उपजीविका सल्लागार मावीम), श्री. नितीन खराबे (उपजीविका सल्लागार, श्री मावीम) सौ. पल्लविताई भोयर, सौ. दुर्गाताई लोंढे, श्री राजेंद्र बावनकुळे, श्री प्रदिप कडबे, प्रदिप दियेवार, उमेश झलके सरपंच,श्री मनोज नौकरकर मिताराम सव्वालाखे, देविदास जामदार,
शाहीर राजेंद्रजी बावनकुळे, शाहीर प्रदीप कडबे, शाहीर मनोहर इंगळे, शाहीर भगवान लांजेवार, शाहीर मधुकर सिंदेमेश्राम, इंदुताई चव्हाण, विमलबाई बडे,सौ आरतीताई ढोबळे, सौ सीमाताई तुमडाम, ललिता दोंदलकर, नंदा खडसे, विमल नागपुरे, रंजना मस्के, वैशाली पटले व (मा.वी.म.) बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.