Monday, November 11, 2024
Homeराज्यगणेशोत्‍सव निमित्‍ताने आझाद हिंद मंडळाची वार्षिक आमसभा संपन्न...

गणेशोत्‍सव निमित्‍ताने आझाद हिंद मंडळाची वार्षिक आमसभा संपन्न…

अमरावती – दुर्वास रोकडे

गणेशोत्‍सव २०२४ निमित्‍ताने स्थानिक आझाद हिंद मंडळ बुधवारा, अमरावती ची वार्षिक आमसभा सोमवार दिनांक २९ जुलै,२०२४ रोजी मंडळाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले यांचे अध्यक्षतेखाली झाली. मंडळाचे सचिव दिलीप कलोती यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.यावर्षी दत्त महिमा हा देखावा साकार करण्यात येणार आहे. या सभेमध्‍ये मागील सभेचे कार्यवृत्‍त मंजुर करण्यात आला. मंडळाच्‍या सन २०२३-२०२४ च्‍या वार्षिक हिशोबास मंजुरी देण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्‍सवाकरीता सचिव व कार्यकारणी जाहीर करण्यात आली.गणेशोत्सव २०२४ च्या सचिव पदी सागर इंगोले, कोषाध्यक्ष निलेश वानखडे, सहसचिव अनिकेत नवघरे, प्रथमेश बाखडे, आकाश मोहोड, वेदांत डांगे, परेश कोरे यांची निवड करण्यात आली.  मंडळाच्‍या दिवंगत सदस्‍यांना यावेळी श्रध्‍दांजली देण्यात आली. यावेळी मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.          

मंडळाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले यांनी या आमसभेला संबोधित करतांना सांगितले की, आपल्‍या मंडळाची परंपरा आपण सर्वांनी जपावी. मंडळ शताब्‍दी महोत्‍सवाकडे वाटचाल करतांना प्रत्‍येकाचा सहभाग हा फार महत्‍वाचा आहे. या मंडळाने अनेक रत्‍न अमरावतीला दिले आहे. या मंडळाची उज्‍वल परंपरा यावर्षी सुध्‍दा मोठ्या थाटामाटात साजरी करायची आहे. यावर्षीचा गणेश उत्‍सवाचा देखावा फार भव्‍य असून या देखाव्‍यासाठी आर्थिक नियोजन करणे फार महत्‍वाचे आहे.

मंडळाचे सर्व हितचिंतकानी, दानदात्‍यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे. यावर्षीचा देखावा मागील वर्षी प्रमाणेच किंवा त्‍यापेक्षाही मोठा करण्‍याचा मानस यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केला. मंडळाचा प्रत्‍येक सदस्‍याने या उत्‍सवात तनमन धनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. यावर्षी श्री गणेशाची मिरवणूक मोठ्या धुमधामात काढण्‍यात येणार असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी नमूद केले. मंडळाचे लेझीम पथक तसेच विविध वाद्य मिरवणूक मध्‍ये राहणार आहे.

यावेळी आझाद हिंद मंडळाच्‍या गणेशोत्‍सव कार्यक्रमामध्‍ये अमरावती शहरातील नागरिकांनी सहभाग घ्‍यावा असे आवाहन माजी महापौर विलास इंगोले यांनी केले आहे. सभेकरिता माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुढे, किशोर फुले, दिलीप दाभाडे, दिलीप कलोती, संजय मुचळंबे, ज्ञानेश्‍वर हिवसे, सतीश चौधरी, चंदु पवार, किशोर कलोती, विवेक कलोती, राजेश बोरारणे, प्रविण मानेकर, दिपक वैद्य, किरण विंचुरकर, निलेश सराफ, राहुल चिखलकर, संतोष चिखलकर, अशोक पोहेकर,मदन पुसतकर, नितीन सराफ,

सुधीर कुटारीया, अमित काजनेकर, पंकज सराफ, अविनाश गुप्‍ता, सुशील कथलकर, किशोर पुसतकर, विनय, सुधीर लोखंडे, राम चावंडे, राजू केमदेव, भगवंत, प्रसाद मोरे, आर्यन ढोले, रेवण पुसतकर, कृष्‍णा हिवसे, सखाराम जोशी, प्रेमानंद पुसतकर, भुषण पुसतकर, प्रशांत पडोळे, नंदकुमार मकवाने, प्रशांत इंगोले, नंदु हातोळे, सुनिल तिप्‍पर, रविंद्र पाटमासे, संजय गुंबळ, सुनिल कोरे, नारायण काळे, दत्‍तापंत जोशी, रघुनाथ निमगावकर, बाळासाहेब उदापुरे, राजेश दुलारे, रवि दुलारे, राहुल कथलकर, सतिश बद्रे, चंद्रशेखर कुलकर्णी,

राजु दोडके, राजेश ढोले, प्रशांत जांभुळकर, सागर रोहनकर, ऋषिकेश चरखे, विजय संगेकर, मुन्‍ना दुलारे, सचिन कोहळे, स्‍वप्‍नील गुल्‍हाणे, अजय पुसतकर, प्रथमेश बोबडे, सागर इंगोले, अनिकेत नवघरे, राजु पिंजरकर, आकाश मोहोड, सुनिल महल्‍ले, अमर चावंडे, राम चावंडे, विवेक आवळे, सुनिल चरखे, वैभव देशमुख, पुसोद जोड यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: