अमरावती शहरातील साईनगर चौकातील फॅन्टसी कॅम्पवर महिला पोलिस कर्मचारी आणि दामिनी पथकाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी छापा टाकून खळबळ उडवून दिली. यावेळी 14 तरुण-तरुणींना अटक करून या सर्व तरुणींना राजापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईमुळे अमरावती शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कॉफी मालकांमध्ये घबराट पसरली आहे. याआधीही राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगासपुरे मार्केटमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
अमरावती पोलिस आयुक्तांनी नुकतेच त्यांच्या आयुक्तालय क्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र घेतले, त्यात प्रामुख्याने गुन्हे शाखेच्या युनिटला यश न आल्याने काही अंशी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे गुन्हे शाखा युनिटवरही नाराज असल्याचे दिसून आले. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा कॉफी पार्लर सुरू असल्याची घटना उघडकीस आली असून, यावर पोलिस विभाग काय कारवाई करणार हे पाहणे बाकी आहे.
हि कारवाई नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त, व श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली Student Police Cadet Programme अंतर्गत श्रीमती दिप्ती ब्राम्हणे, पोलीस निरिक्षक, पो.उप.नि. सुषमा आठवले यांनी केली असून या कारवाईने शहरातील असे कॅफे चालणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.