रामटेक – राजू कापसे
28 जुलाई ला समर्थ महाविद्यालय रामटेक येथे 37 वर्ष्या पुर्वीचे 1987 बैचच्या 45 माजी विद्यार्थाचे मित्रायन 2024 अंतर्गत स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला गेला. सकाळी मित्र-मैत्रिणींचे आगमन, ओळखा मी कोण आहे, नव्याने परिचय व वर्गात संगीतमय आगमन झाले. गुरुजनांना आमंत्रित केले व त्यांचे वर्गात आगमन झाले. गुरुजनांच्या सत्कार करण्यात आला व त्यांचे मार्गदर्शन झाले.
मित्र – मैत्रिणींच्या शालेय जीवनातील आठवणी काढण्यात आल्या. त्यात त्यानी एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो कबड्डी व क्रिकेट चे डाव आदि गोड आठवणी काढल्या.
दुपारी सर्वांना स्मृति चिन्ह, सर्वांसमवेत फोटो, प्रेक्षणीय स्थळास भेट, स्नेहभोजन, गीत, संगीत व विविध खेळ खेळले. सायंकाळी समारोप करण्यात आला. या वेळी समर्थ विद्यालयचे सचिव, ऋषी किमंतकर, प्राचार्य शंखपाल लांजेवार, शिक्षक लालाजी गायधनी आनंद बारोकर, किशोर पानसरे, घनश्याम बर्वे, महेंद्र येरपुडे, सुशील कुदमुलवार, नशिर खान, बबलु गज्जलवार, विरेश आष्टणकर, विवेक माकडे, जयश्री देशमुख (रागीट), काजल मेहता, सुनीता अहिरकर,संगीता लारोकर, नीलिमा टक्कामोरे सहित आदि विद्यार्थि उपस्थित होते.