Monday, December 23, 2024
Homeराज्यबांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण २९ जुलैपासून बंद...

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण २९ जुलैपासून बंद…

अमरावती – दुर्वास रोकडे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईमार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृती सक्रिय(जिवीत) बांधकाम कामगारांना कंपनीमार्फत गृहपयोगी वस्तु संच वितरीत तालुकास्तराव करण्यात येते होते. परंतु मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई यांचा गृहउपयोगी संच वाटपाचा पुरवठा आदेश संपल्यामुळे पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नगरपरिषद येथील गृहपयोगी वस्तू संच वाटप दि. 29 जुलै 2024 पासून बंद करण्यात आला आहे.

तसेच नवीन पुरवठा आदेश प्राप्त होताच पूर्वीप्रमाणे गृहपयोगी वस्तू संच वितरीत करण्यात येईल,यांची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहायक कामगार आयुक्त कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: