Saturday, December 21, 2024
Homeखेळजागतिक व्याघ्र दिनानिमित्त 'रन फॉर टायगर' चे आयोजन…

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘रन फॉर टायगर’ चे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूर व धनेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिनाच्या औचित्याने ‘रन फॉर टायगर’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वनविभागाअंतर्गत येणाऱ्या बफर क्षेत्रातील व बफर क्षेत्राबाहेरील मुला-मुलींनी उत्साहपणे सहभाग नोंदविला.तर उपक्रमात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या मुला-मुलींना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले.

गेल्या ६ ते ७ वर्षापासून २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वनपरिक्षेत्र सिल्लारी येथे बफर क्षेत्र व क्षेत्राबाहेरील युवक-युवतींची दौड आयोजित करण्यात येते.यात सहभागी होणाऱ्या सर्व युवक-युवतींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.तर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या मुलांना ट्रॉफी,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तर चित्रकला स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून तेथील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुलांना बक्षीस वितरित करण्यात आले.

या आयोजित पुरुष वर्गाच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणारा कु.यश सोनगोंदे यांना रोख रक्कम १०,००० रु,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक कु.स्वप्नील सोनगोंदे रु.५०००,प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह तर तृतीय क्रमांक कु.आकाश परतेती रु.३०००,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन धनेश फाउंडेशन द्वारे गौरविण्यात आले.

तर विजेत्या महिला गटाला स्वर्गीय परेकर गुरुजी स्मृती प्रित्यर्थ बक्षीस वितरित करण्यात आले.यात प्रथम क्रमांक विजयश्री हटवार, द्वितीय रजनी राऊत,तृतीय ऋषिका यादव यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.बफर क्षेत्राबाहेरील विजेते राजन यादव यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह देऊन गौरविले. तसेच चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना,स्टार ऑफ मंथ ठरणारे वनविभागातील कर्मचारी,डी.आर.टी. टीम,आर.आर.टी. वाहनचालक, वेशभूषा स्पर्धा यातील प्रशंसनीय कार्य करणाऱ्याचे सत्कार करण्यात आले.

यावेळी मंचावर क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला,नागालँड वनसंरक्षक हेमंत कामडी,विभागीय वनाधिकारी पेंच सोनल कामडी,प्रकल्प समन्वयक अजिंक्य भटकर, जि.प.सदस्या शांताबाई कुमरे, पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील,धनेश फाउंडेशन अध्यक्ष स्मित गुप्ता उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय परेकर (सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी) यांनी केले तर प्रास्ताविक जयेश तायडे यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: