मूर्तीजापुर – नरेंद्र खवले
मूर्तीजापुर येथे माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले,1 नोव्हेबंर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर १००% टक्के अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक; शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन मिळावी याकरता न्यायालयात सकारात्मक शपथ पत्र सादर करण्याकरिता शासन दिरंगाई करत आहे आणि म्हणून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक असून लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याची घोषणा विधिमंडळात केली होती,
तसेच जुन्या पेन्शन याचिकेबाबत 18 जुलै 2024 रोजी झालेल्या सुनावणीत शासनाच्या वतीने युक्तिवाद मांडणारे सरकारी वकील अँड. आदित्य पांडे साहेब यांनी महाराष्ट्र शासन लवकरच सकारात्मक शपथपत्र सादर करणार असल्याची भूमिका मांडली होती सर्वोच्च न्यायालयात जुन्या पेन्शन बाबतची आगामी सुनावणी ही 7 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे मुख्यमंत्र्याच्या घोषणेला बराच कालावधी लोटून गेलेला आहे.
अद्याप पर्यंत शपथपत्र महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन स्तरावर सादर करण्याच्या दृष्टीने कुठल्याच हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आले नाही आणि म्हणून राज्यातील 26000 मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षण संघर्ष संघटना राज्याध्यक्ष सौ संगीता ताई शिंदे (बोंडे )यांच्या नेतृत्वाखाली शपथपत्र मिळण्यासाठी नाईलाजास्तव 1 ऑगस्ट 2004 पासून संत नगरी श्री गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे.
कृपया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करता शासनाने लगेच कारवाई करावी अन्यथा पुनश्च एकदा दिनांक 1ऑगस्ट 2024 पासून राज्यातील पेन्शन पीडित बांधवांना आंदोलनाचे हत्यार उपसल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि हे आंदोलन शेवटचे असल्यामुळे कुठल्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. निवेदन देण्याकरिता तालुकाध्यक्ष दिगंबर भुगूल सचिव बंडू नळकांडे, सौ. ढोकणेमॅडम,गोपाल सोनोने सौ. अर्चना तायडे, विनोद तायडे, नितीन मोरे ,दिवाकर मेहरे,दिलीप तायडे, विनोद झोड ,कुबेटकर ,सातपुते वानखडे ,हुसेन शेख पठाण, मीर अली अफसर अली, अब्दुल नेम अब्दुल हकीम गजाला अन्सारी मिर्झा मनोज बाईस्कर ,विजय इंगळे इत्यादींची उपस्थिती होती.