Saturday, November 23, 2024
Homeराज्यनांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील ३२,८९,००० /- रूपयाचे २०५ अँड्रॉईड मोबाईल...

नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील ३२,८९,००० /- रूपयाचे २०५ अँड्रॉईड मोबाईल…

हस्तगत:हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखून सायबर शाखेतून मोबाईल घेऊन जाण्याचे पोलिसांचे आवाहन

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, सायबर शाखा व पोलिसांच्या पथकाने लावला असून एकूण 205 मोबाईल किंमत 32 लाख 89 हजार रुपयाचे हस्तगत केले आहेत. पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांच्याहस्ते नागरिकांना मोबाईल वाटप करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखून सायबर पो. स्टे. नांदेड येथून मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली.
नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 205 मोबाईल किंमत 32,89,000 /- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे.

त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन केले आहे. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2024 मध्ये 614 मोबाईल अंदाजीत रक्कम 1 कोटी 95 हजार रूपयाचे हस्तगत केले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, नांदेड डॉ. खंडेराय धरणे, भोकर, गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप पो. नि. उदय खंडेराय स्थागुशा, पोनि धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. स्टे सायबर पोउपनि एम. बी. चव्हाण, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर,

दिपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद असीफ, विलास राठोड, रेशमा पठाण, काशीनाथ कारखेडे किशोर जैस्वाल, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी CEIR पोर्टलवर आपले गहाळ झालेल्या मोबाईलची माहित अपलोड करण्याचे अवाहन केले आहे आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: