अमरावती – दुर्वास रोकडे
सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित नांदगाव खंडेश्वर येथील प्रियदर्शनी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे शैक्षणिक सत्र 2024-25 करिता कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थींनीनी वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रियदर्शनी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.