अमरावती – प्रणव हाडे
तिवसा तालुका राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातर्फे केन्द्र सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.स्थानिक बाजार ओळ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेत्रुत्व तिवसा तालुका राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष श्री.भूषण यावले यांनी केले.
आजच्या आंदोलनात तालुका अध्यक्ष भूषण यावले यांचेसह राष्ट्रवादी कॅाग्रेसचे पदाधिकारी सर्वश्री प्रविण केणे, दिनेश गंधे,राजू किरक्टे,सुनील बोके,शरद खवले,अमोल पाटील, रोशन अढावू ,प्रदीप सोनोने,दिनेश मोहतुरे,संजय कांडलकर,हर्षल गोरडे,गौरव वाघ,सुनील घोरमाडे,व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.