बाळापूर – सुधीर कांबेकर
नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा औरंगपुरा बाळापूर येथे शासनाचे निर्देशानुसार मुख्याध्यापक रमेश डाबेराव यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यानुषंगाने पालक , शिक्षक, विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य सादरीकरण “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक बाजारपेठ”, “माझे कुटुंब इत्यादी तसेच फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनविले प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनविले. आणि कथा कथन सत्र यांचे आयोजन करण्यात आले.
शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवून प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडले गेले. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात आले.प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे देण्यात आली शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवले गेले. गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन
हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित केल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले…