रामटेक – राजु कापसे
लाडली बहिन योजना करीता, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे यांचा कार्यालया मार्फ़त केलेल्या शेकड़ो रेजिस्ट्रेशन चा पावती वाटप कार्यक्रम ग्राम पंचायत मनसर समोरील सांस्कृतिक सभागृहात दि. 15/07/24 ला घेण्यात आला.
या कार्यालया मार्फ़त नोदनी केलेल्या माता भगिनीनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालेल्या आपल्या पावत्या स्वीकारल्या. महाराष्ट्र शाशनचा लाडली बहिन योजना अंतर्गत महिलाना प्रति महीना 1500/- रूपये अनुदान मिडणार आहेत. भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा द्वारा ही योजना प्रत्येक महिले परन्त पोहचवन्या साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, भाजयुमो जिल्हा महामंत्री नंदकिशोर चन्दनखेड़े, सरपंच कैलास नरुले, उपसरपंच योगेश गोस्वामी, ग्राम पंचायत सदस्य देवदत्त तांडेकर, कविता वाडिवे, कल्पना बागड़े, सुनंदा पंन्द्राम, रेखा मड़ावी, व शेकड़ो महिला उपस्थित होत्या.