अकोला : फुफ्फुसाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त मंजूर शेख मुनीर यांच्या दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करुन या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. आशिष सालकर यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे या रुग्णांकरिता डॉ. सालकर देवदूत ठरले आहेत. दरम्यान, आतापर्यंत फुफ्फुसावर जगात १९८१ पासून केवळ ३० हजार शस्त्रक्रिया झाल्या असून, भारतात केवळ ४७५ तर महाराष्ट्रात फक्त २४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दोन्ही फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाची विदर्भातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असावी.
मंजूर अहमद शेख मुनीर २०१७ पासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर डॉ. सालकर यांचे उपचार सुरु केलें २०१७ ते २०२४ पर्यंत उपचार घेऊनदेखील त्यांना फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढत नसल्याचडॉ. सालकर यांच्या सल्ल्याने यशोदा हॉस्पिटल सिकदराबाद येथे दोन्ही फुफ्फुसांचे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले. मंजूर आता आजारातून स्थिरावत असल्याचा दावा.डॉ. सालकर यांनी केला आहे.
मंजुर यांच्या दोन्ही फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करणे आवश्यक आवश्यक होते.जेमतेज आर्थिक परिस्थितीत जीवन व्यथीत करणाऱ्या कुटुंबाने महागडी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. होते नव्हते विकटाक करून पैशाची जुळवाजुळव केली. दोन्ही भावांनी आपल घर विकून मंजूरच्या खर्चाची तजवीज केली व मंजूरच्या फुप्फुस प्रत्यारोपणास आर्थिक बळ दिले. आता मंजूरच्या शारीरिक हालचाली गतिमान झाल्या आहेत. रुग्ण आता मोकळा श्वास घेतो आहे. – डॉ. आशिष सालकर