Sunday, December 22, 2024
Homeराज्यकुंभारी व वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण...

कुंभारी व वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण…

कुंभारीतील नागरिकांचे कार्य अभिमानास्पद : बी वैष्णवी

कुंभारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक वृक्ष आईसाठी या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कुंभारी व वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण जि प मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी यांच्या हस्ते श्री विश्वेश्वर महादेव संस्थान च्या प्रांगणात संपन्न झाला.प्रसंगी कुंभारी गावातील जनतेचे वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले.

वृक्षमित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.तुकारामजी बिडकर यांनी वृक्षारोपण व सवर्धनाची माहिती देऊन वृक्षमित्र फाऊंडेशन: कुंभारी परिसरात ५ हजार रोपांची लागवड करणार असल्याचे सांगितले तर सामाजिक वनीकरण उपसंचालक महेश खोरे यांनी ग्रामपंचायत कुंभारी व वृक्षामित्र फाऊंडेशन च्या उपक्रमाचे कौतुक करून फाऊंडेशनला अधिकाधिक रोपे पुरविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपवनसंरक्षक डॉ कुमारस्वामी एस आर,तंटामुक्ती अध्यक्ष नारायणराव गावंडे, जय बजरंग मंडळाचे सचिव डॉ. नारायणराव बिरकड,गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार चित्रपट निर्मात्या राधाताई बिडकर, पं स सदस्य विजय बाभुळकर, श्रीकृष्ण बिरकड, सरपंच ऋषिकन्या अतकरे, माजी सरपंच बाळासाहेब अतकरे, समाजसेवक शांताराम मुरूमकार, महावीर यादव, किशोर बळी, गजानन महाराज आगळे उपस्थीत होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: