Sunday, December 22, 2024
Homeराज्यधोप येथे उच्च प्राथमिक शाळेला पालकांनी ठोकला टाला...

धोप येथे उच्च प्राथमिक शाळेला पालकांनी ठोकला टाला…

भंडारा – सुरेश शेंडे

मोहाडी तालुक्यातील जि प उच्च प्राथमिक शाळा धोप येथे शिक्षकांची कमतरता असल्याने शाळेला टाला ठोको आंदोलन करत शाळेच्या गेटला पालकांनी टाळा ठोकला.मोहाडी तालुक्यातील धोप येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे एक प्रभारी मुख्याध्यापक व दोन शिक्षक आहेत. शाळेत सातवी इयत्तेपर्यंत नियमत वर्ग असल्याने गेल्या दोन वर्षापासून तीनच शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक विविध कार्यालयीन कामात असतात. अश्यावेळी दोनच शिक्षकांनी शिकवनार कसे असा पालकांना लक्षात आलें.

अधिक शिक्षकांच्या मागणीसाठी दुर्लक्ष झाल्याने , विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आक्रमक टोकाची भूमिका घेत शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत पदाधिकारी, पालकवर्ग, व ग्रामवाशियांनी शाळेला कुलप ठोकून आंदोलन केले. पालक वर्गांच्या समस्या ऐकून घेण्या करिता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदचे सदस्य यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.शाळेसंदर्भात , शिक्षकांसदर्भात चर्चा केली.

लवकरच शिक्षकांची पूर्तता कऱण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.यावेळी सरपंच सिमाताई मंडारी, उपसरपंच, शामजी शेंडे , पंचायत समितीचे सदस्य जगदीशजी शेंडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सपाटे, उपाध्यक्ष शिवदास चवळे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रजी पिकलमुंडे , माजी उपसरपंच तुळशीजी मोहतुरे, संभाजी ब्रिगेडचे ॲड.राकेश सिंदेगणसुर, शुभम धुमनखेडे, ग्राम पंचायतचे सदस्य ,तंटामुक्ती अध्यक्ष,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालकवर्ग,व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गट विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासन घेवून व जिल्हा परिषद सदस्य देवाभाऊ इलमे यांच्या मध्यस्ती नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: