Sunday, November 17, 2024
Homeराज्यअमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने अजय पाटील यांना डिलीट पदवी दिल्याने लोकगर्जेना प्रतिष्ठान तर्फे...

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने अजय पाटील यांना डिलीट पदवी दिल्याने लोकगर्जेना प्रतिष्ठान तर्फे सत्कार…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर- लोकगर्जना प्रतिष्ठान चे अध्यक्ष तसेच वनराई फाउंडेशन चे विश्वस्त, वनरक्षक वा वनपाल संघटनेचे अध्यक्ष तसेच राज्यातील विविध सामाजिक,सांस्कृतिक,पर्यावरण क्षेत्रातील संस्थेचे पदाधिकारी श्री अजय पाटील यांना पर्यावरण विषयात संशोधन केल्याने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील विद्यापीठाने डिलीट पदवी बहाल केल्याने आज लोकगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आमदार निलय नाईक व महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री दिनेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ व अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक लोक गर्जना प्रतिष्ठान चे सचिव राजेश कुंभलकर यांनी केले याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री अजय पाटील यांनी सांगितले की मी गेल्या अनेक वर्षा पासून पर्यावरण क्षेत्रात वनराईच्या माध्यमातून विविध विषयावर अभ्यास करीत आहे. ह्याची दखल अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने घेतली असून मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.

मी याबद्दल माझे सर्व गाईड्स गुरुजनांना तसेच वनराईचे विश्वस्त मा.डॉ.गिरीश गांधी यांना श्रेय देतो याप्रसंगी माजी नगरसेविका प्रगती पाटील,बंटी मुल्ला,तनुज चोबे ,शरद नागदिवे, राजु आसोले, पराग नागपुरे,शुभंकर पाटील,अल्ताफ अन्सारी ,विठ्ठल ठेंगरे,कृष्णकुमार पडवंशी,श्री दुबेजी प्रामुख्याने उपस्थित होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: