कोगनोळी – राहुल मेस्त्री
हंचिनाळ ता.निपाणी येथील हंचिनाळ ते कोगनोळी हा सहा किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराप झाला असुन याबाबत लोकप्रतिनिधींनीकडे वारंवार हा रस्ता डांबरीकरण करणे बाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थाच्या वतीने दि.16 रोजी बेमुदत उपोषणाला सुरु केले होते.
गेल्या कित्येक दिवसापासून हंचिनाळ कोगनोळी रस्त्याला वाली कोण ? असाच प्रश्न या भागातील प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांच्यातून उपस्थित केला जात होता. रस्त्यात खड्डे की खड्ड्यातील रस्ता अशी म्हणण्याची वेळ नागरिकांच्या वरती आलेली होती. प्रशासनाने या रस्त्याकडे पूर्णता काना डोळा केला होता.म्हणून हंचिनाळ येथे बेमुदत उपोषण सुरुवात केले होते.
या उपोषणाला माजी आमदार प्रा.सुभाष जोशी,निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजु पोवार यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बेडक्याळे यांनी भेट देऊन सदर रस्त्याची डागडूजी लवकरच करून घेण्यात येईल व येत्या दीड महिन्याच्या आत डांबरीकरण रस्त्याचे सुरू करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी तायगोंडा पाटील, ब्रम्हनाथ संस्थेचे माजी चेअरमन अनिल कुरणे, सिताराम कोंडेकर, दयानंद पाटील, पी के पी एस चेअरमन अरुण चौगुले, सुनील गवळी, पिंटू पंचम, विजय नलवडे ,उमेश गुरव, बाबासाहेब पोवार, कृष्णात भिवसे,सिताराम कोंडेकर ,जनार्दन पाटील, पिंटू विजय, संभा कोंडेकर, सुभाष कोंडेकर,राहुल पाटील,
बाबासो कोंडेकर, बाळासो गायकवाड ,दादासो चौगुले, अरुण डोंगरे,संतोष संकपाळ ,आप्पासो चौगुले, चंद्रकांत पंचम, विजय सुतार, कृष्णा पवार,संजय नलवडे ,बाळासाहेब कोंडेकर, अरुण डोंगरे, कृष्णात कोंडेकर ,विजय चौगुले ,दीपक पाटील, अरुण पाटील ,सागर भिवसे ,रावसाहेब मजगे, विलास जाधव, आप्पासाहेब रामनकट्टी, दीपक पाटील,अनिल कुरणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.