अमरावती : काल रविवारी दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अंबानाल्याला मोठा पूर आला. या पुरात लालखडी परिसरातील १४ वर्षे वयाचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळावर पोहोचले असून, मुलाचाशोध सुरूआहे. परवेज खान अफरोज खान (१४) रा. लालखडी असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.
१४ जुलै रोजी दुपारी १ वाजता पासून शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्या पावसामुळे अंबानाल्याला मोठा पूर आला होता त्या पुरात परवेज खान वाहून गेला होता अखेर त्याचा मृतदेह हातुर्णा गावाच्या पुलाजवळ मच्छिमाराच्या मदतीने शोधून काढला..
दरम्यान लालखडी परिसरात राहणारा परवेज खान हा आपल्या घराजवळ असलेल्या अंबा नाल्याजवळ उभा होता. त्याचा नाल्यात अचानक तोल जाऊन तो पुरात पडला. यावेळी तो पुरात वाहून गेला. घटनेची माहिती नागरिकांनी आपातकालीन विभागाच्या बचाव पथकाला दिली असता बचाव पथकाने घटनास्थळापासून परवेज खानचा पुरात शोध घेणे सुरू घेतला असता तब्बल रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळच्या सुमारास हातुर्णा गावच्या पुलाजवळ कचऱ्याच्या ढिगार्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.