अमरावती: शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येत असलेल्या विलास नगरातून एका चोरट्याला पकडण्यात गाडगे नगर पोलिसांना यश आले आहे. शुभम माणीकराव बोबडे वय 26 वर्ष रा,काकडा ता. अचलपुर जि. अमरावती ह.मु विलास नगर अमरावती असे आरोपीचे नाव असून त्याने सोन्याची दोन पत्री मोहण माळ वजन 29.180 ग्रॅम किंमत 1.70,000/ रुपये प्रमोद माणीकराव तायडे यांच्या घरातून चोरून नेली असल्याने त्याच्या विरुद्ध दि. 13/7/2024 रोजी गाडगे नगर पो स्टे ला येवुन जबानी रिपोर्ट दिला की, दि.2/7/2024 रोजी फिर्यादीचे घराचे पि.ओ.पी मधील लाईट फिटींग करण्याकरीता यातील नमुद आरोपी शुभम नावाचा मुलगा आला होता. व काम करुन गेला. नंतर फिर्यादीचे लक्षात आले की, पी.ओ.पी च्या लाईटच्या डमी डबित ठेवलेली सोण्याची दोन पत्री मोहण माळ वजन 29.180 ग्रॅम किंमत 1.70,000/- रु पाहली असता दिसुन आली नाही ती शुभम नावाच्या इसमाने चोरी केल्याचा संशय असल्याने सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अश्या प्रकारे आहे की, यातील नमुद घ. ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी याचे घरी पी.ओ.पी मधील लाईट फिटींगचे काम यातील आरोपी शुभम नावाचा ईसम याचे कडुन करुन घेतले नंतर फिर्यादीचे लक्षात आल्या वर, ईलेक्ट्रीक डमी प्लेट मध्ये ठेवलेली सोन्याची मोहन माळ वजन 29/180 ग्रॅम किंमत 1,70,000/- रु ची पाहली असता त्यांना दिसुन आली नाही. शुभम नावाचे ईसमाने चोरी केल्याचा संशय असल्याबाबत तक्रार दिल्या वरुन सदर चा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांना संशईत ईसम शुभम यांचे बाबत अधिक विचारपुस करुन त्यांचा पो स्टे हददीत विलास नगर परीसरात शोध घेतला असता बाना कॉर्णर विलास नगर चौक येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास पो स्टे ला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव शुभम माणीकराव बोबडे वय 26 वर्ष रा,काकडा ता. अचलपुर जि. अमरावती ह.मु विलास नगर अमरावती असे सांगुन तो ईलेल्ट्रीक फिटींग व प्लबींग चे काम करतो. त्याने फिर्यादी प्रमोद तायडे यांचे घरी काम केल्याचे सांगीतले. त्याला गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाला बाबत विचापुस केली असता त्याने चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.
गुन्ह्याचे तपासात आरोपीचे दोन पंचा समक्ष निवेदन नोंदवुन मेमोरंडम पंचनामा प्रमाणे 26 ग्रॅम पिवळ्या धातुची सोन्याची लगड किंमत अंदाजे 1,53,000/- रु चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करुन अवघ्या दोन तासात आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस आयुक्त अमरावती शहर सो. मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्रं 1 मा.साहाय्यक पोलीस आयुक्त सो. गाडगेनगर विभाग वरीष्ठ पोलीस निरीक्षक पो.स्टे गाडगेनगर यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी पथक प्रमुख पोहेकाँ भारत वानखडे ब नं 105, सोबत पोउपनि संजय शिंदे व पो. स्टॉफ पो.काँ प्रशांत वानखडे ब नं 1615, पो.काँ गुलरेज खान ब नं 551, पो.काँ नंदकिशोर करोची ब नं 595, पो.काँ जयसेन वानखडे ब नं 1733 यांनी केला आहे. व गुन्हा उघडकीस आणला.
तपास अधि/तपास मध्ये मदत करणारे पोलीस कर्मचारी /इंतर मा. पोलीस आयुक्त अमरावती शहर सो. मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्रं । मा.साहाय्यक पोलीस आयुक्त सो. गाडगेनगर विभाग वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत माने पो.स्टे गाडगेनगर यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी पथक प्रमुख पो. स्टॉफ पोहेकाँ भारत वानखडे ब नं 105, पोउपनि संजय शिंदे व पो. स्टॉफ पो.काँ नंदकिशोर करोची ब नं 595, पो.काँ प्रशांत वानखडे ब नं 1615, पो.काँ गुलरेज खान ब नं 551, पो.काँ जयसेन वानखडे ब नं 1733 यांनी केला आहे.