Sunday, December 22, 2024
Homeराज्यबहुजन समाज पार्टी च्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आठवले...

बहुजन समाज पार्टी च्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आठवले…

मालेगाव (वाशीम) – चंद्रकांत गायकवाड

आगामी विधानसभा निवडणूक संदर्भाने बहुजन समाज पक्षामध्ये मोठे फेरबदल झाले असून वाशीम जिल्ह्याच्या बहुजन समाज पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी समाज कार्यात सदा अग्रेसर असणारे प्रकाश आठवले यांची ॲड.सुनीलजी डोंगरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांनी नियुक्ती शुक्रवार दिनांक १३जुलै रोजी वाशीम येथे विश्रामगृह येथे केली.

मालेगाव तालुक्यातील माळेगांव न.की.येथील रहिवासी असून त्यांची सामाजिक व राजकीय कार्याची दाखल घेत प्रकाश आठवले यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर यावेळी प्रकाश आठवले यांनी शाहू,फुले,आंबेडकर,पेरियार,कांशीराम यांचे अधुरे असणारे कार्य बहुजन समाज पार्टी करत असून बसप चे हे मिषण आपण तन,मन,धन अर्पण करत बहन मायावती यांना अभिप्रेत असणारे संघटना बांधण्यासाठी व पक्ष बळकटी साठी व पक्षाची ध्येय धोरण सामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी कटिबध्द आहोत,असे प्रकाश आठवले यांनी सांगितले.

तर ॲड.सुनीलजी डोंगरे बसप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,अविनाश वानखेडे यांचे सतत मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ॲड संघनायक मोरे,ॲड राहुल गवई,विनोद अंभोरे,नागेश अवचार,गजानन ढाले, योगेश अवचार,राजेश भगत,भारत सावळे,मोहन खिराडे, प्रशांत आठवले,नथ्थु लबडे,विशनु पंत ,विकास खंडारे, विनोद कांबळेव बसप च्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: