Sunday, November 17, 2024
Homeराज्यनिसर्गराजा फाउंडेशनतर्फे विमानतळ भागातील शिवणगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…

निसर्गराजा फाउंडेशनतर्फे विमानतळ भागातील शिवणगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – निसर्गराजा फाउंडेशनतर्फे दरवर्षी पावसाळ्यात वृक्षवृक्षारोपणचा उपक्रम राबविण्यात येतो. सर्वप्रथम मनिष नगर भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी ७ जुलै रोजी विमानतळ भागातील शिवणगाव येथे निसर्गराजा फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक अनेक प्रकारची झाडे लावून प्रदुषण मुक्तीचा संदेश दिला.

पर्यावरणासाठी पोषक असलेली व ऑक्सीजनची भरपूर मात्रा असलेली पिंपळ, निम, वड , बकुळ, शिसम, अशोक, कडुनिंब आदी झाडे लावून “झाडे लावा झाडे जगवा” चा शिवणगाव भागात संदेश देण्यात आला. यावेळी शिवणगाव परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते व वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक करीत होते. यावेळी परिसरातील बालकांनी देखील झाडे लावून झाडे जगविण्याची शपथ घेतली.

वृक्षारोपणच्या वेळी प्रा. शिवाजी ढुमने, वामनराव नंदागवळी, काशिनाथ ब्राम्हणे, अभिजित रामटेके, डॉ. सोहन चवरे, प्रमोद शेंडे, सुभाष नागदेवे, युवराज फुलझले, आदिनाथ शामकुवर, देविदास ढेपे, शांताराम बहादुरे, संजय बहादुरे, सूर्यकांत सावनकर, पितांबर बालपांडे, महेंद्र सोनारकर, आत्माराम मेश्राम, मदन पखिड्डे, भास्कर अकुला आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी ढुमने यांनी केले. त्यांनी निसर्गराजा फाउंडेशन स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. अभिजित रामटेके यांनी ज्या घरासमोर वृक्ष लावण्यात आले आहे त्या भागातील लोकांनी लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोहन चवरे यांनी केले तर व आभार प्रदर्शन युवराज फुलझले यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: