एक पात्री प्रयोग, कविता, आणि गीत गायनाने पातुरकर झाले मंत्रमुग्ध…
पातुर – निशांत गवई
पातुर येथील सुप्रसिद्ध कवी कलावंत पत्रकार देवानंद गहिले यांच्या वाढदिवसानिमित्त “एक दिवस कलेचा” या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पातुर येथील संत सेवालाल महाराज सभागृह येथे 4 जुलै 2024 रोजी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पातुर तहसीलचे महसूल नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण तर पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, राजपूत समाज पिंपरी चिंचवड पुणे चे अध्यक्ष युवा उद्योजक शिवकुमार सिंह बायस ठाकूर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुशे,
पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर लाड, ज्येष्ठ कवी गोकुल भाई हरणे, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर भाई, ज्येष्ठ पत्रकार रमेश देवकर, पत्रकार निशांत गवई, ज्येष्ठ कलावंत लेखक इकरार हुसेन आझाद,अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दादाराव पाथरीकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष वासुदेवराव खोपडे, अंकुरचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णरावजी घाडगे, सुदेश इंगळे सर संपादक शिक्षण दूत, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकररावजी बोचरे, अंकुर साहित्य संघाचे तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मनोहर घुगे, जिल्हा सचिव धीरज चावरे,
अंकुर साहित्य संघाचे जिल्हा पदाधिकारी विष्णुपंत जोध,तालुका सचिव प्रा. विठोबा गवई, पत्रकार इरफान शेख, संगीत तज्ञ प्रा. विलास राऊत, प्रसिद्ध गायक देविदास निलखन, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक डॉ. शांतीलाल चव्हाण, विदर्भाचे प्रसिद्ध कवी शिवलिंग काटेकर, कवी सुनील दिवनाले, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख चित्रपट निर्माते डॉ. शेख चांद, समाजसेवक अतुल अमानकर, समाजसेवक नानाराव देशमुख, पातुर नगर परिषद माजी अध्यक्ष प्रभाताई कोथळकर आदीची यावेळी मंचावर उपस्थित होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पातुर तालुक्यातील लेखक, कवी च्या पुस्तकांच्या निर्मितीचे पूजन करून दीप प्रज्वलन केले त्यानंतर वाढदिवसानिमित्त देवानंद गहिले यांचा मराठी पत्रकार संघ, अंकुर साहित्य संघ, राष्ट्रीय ग्राहक पंचायत, लोकमत सखी मंच, तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान , भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पातूर यांच्यावतीने तहसीलदार बळीरामजी चव्हाण, ठाणेदार किशोर शेळके आणि इतर मान्यवरांनी यावेळी सत्कार केला. याप्रसंगी ठाणेदार किशोर शेळके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले आणि “विठू माऊली तू माऊली जगाची” या गीताचे सुंदर गायन केले तर बळीरामजी चव्हाण यांनी “ओ साथी रे” या दर्जेदार गीताचे मनमोहक गायन करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये एकापेक्षा एक कलावंत गायकांनी आपली गायन कला सादर केली. यामध्ये सुप्रसिद्ध गायक कलावंत स्टार गायिका प्रा.करूणा विठोबा गवई यांचे “ऐ मेरे वतन के लोगो” या गीताचे गायनाने सुरुवात झाली या गीता नंतर राष्ट्रभक्तीमुळे वातावरण तयार झाले. यानंतर पातूर येथील कलावंत कु. स्वरा वसंत गाडगे हिने भारत मातेची हुबेहूब वेशभूषा करून एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर पातुर तालुक्यातील गावंडगाव येथील माजी सैनिक विजय जाधव यांनी सुंदर बासरी वाजवून कार्यक्रमात रंगत आणली याप्रसंगी रील मास्टर गुलाब अंभोरे यांनी एका गीतावर भन्नाट नृत्य सादर केले तर बाल कलाकार जान्हवी थेटे रा.तांदळी आणि राधिका संतोष नाकट या दोघींनी आपल्या सुंदर मनोगत राष्ट्रभक्तीवर सादर केले.
डॉ. मनोहर घुगे, तसेच प्रा. विठोबा गवई आणि प्रा. करुणा गवई व देवानंद गहिले दिपमाला गहिले यांनी युगल गाण्याचे सुंदर गायन करून कार्यक्रमात रंग आणला तसेच जय देवकर आणि ओम देवकर, कृष्णराव घाडगे, पत्रकार इरफान शेख, विनोद इंगळे, प्रा.उज्वला मनवर, श्रीमती बेबीताई इंगळे, भारतीताई गाडगे, समर्थ किशोर राखोंडे, रमेश निमकंडे आदिसह इतर गायक कलावंतांनी एकापेक्षा एक अशी सकस दर्जेदार गीत गायन करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले तर कवी संमेलनामध्ये डॉक्टर एच.एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्रा. अरविंद भोंगडे ,वसंत उजाडे, नंदकुमार ठक, सुरेश डाबेराव, प्रा. मुकुंद कवळकर यांच्यासह इतर मान्यवर कवि यांनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून मने जिंकली या कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये विशेष गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी पत्रकार संघाचे वतीने सन्मानपत्र देऊन यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलावंत प्रा. करुणाताई गवई यांनी केले आभार प्रदर्शन अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे यांनी व्यक्त केले आणि द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक वसंत गाडगे आणि प्रा. मुकुंद कवळकर तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक डॉ. शांतीलाल चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाला सौ. वैशालीताई निकम, सौ. उर्मिलाताई गाडगे, वर्षा अंभोरे, श्रीमती बेबीताई इंगळे, सुप्रिया इंगळे, आचल सुरवाडे, श्रीमती शीलाताई कांबळे, सौ देवकाबाई खंडारे, प्रा. शंकर गाडगे, प्रा. वसंतराव गाडगे,
दिलीप गिऱ्हे, मोहम्मद हयात जमदार, शेख मुख्तार सर, माणिक ठाकरे, भोजने साहेब, अब्दुल करीम सर, वीर पिता काशीरामजी निमकंडे, मनोहर सोनोणे, बाळाभाऊ सरोदे, सय्यद हसन बाबू, जुबेर शेख, नाझीम शेख,राहुल सोनोणे, गोविंदराव देशमुख, छोटू भाऊ जोशी, सुहास देवकर, चंद्रशेखर सुगंधी, ह भ प.लक्ष्मण महाराज बारतासे, पंकज पोहरे, गणेश श्रीनाथ, माजी सैनिक रवींद्र श्रीनाथ, निरंजन बंड, सर्व धर्मीय हॉटेल कामगार संघटनेचे गंगाराम डोंगरे, राजेश खंडारे, सुरेश देशमुख डॉ. दिलीप अतकर देविदास निमकंडे, निळकंठ अंधारे आदी सह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, अंकुर साहित्य संघ, ग्राहक पंचायत पातुर, तनिष्का स्त्री प्रतिष्ठान अभियान, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन यांच्यासह इतर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.