Saturday, October 19, 2024
Homeराज्यभरती पूर्व प्रशिक्षण शाळा (एन.टि. पी. एस.) हिवरा बाजार येथे वृक्षारोपण...

भरती पूर्व प्रशिक्षण शाळा (एन.टि. पी. एस.) हिवरा बाजार येथे वृक्षारोपण…

रामटेक – राजु कापसे

आज हिवरा बाजार येथील एनटीपीएस भरती पूर्व प्रशिक्षण शाळेत वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला , त्यात विविध प्रजाती ची लिंबू,कडुनिंब, पेरू, आवळा,फणस, जांभूळ,रामफळ,आंबा, असे एकूण 575 फळझाडे शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. टी. एस.भाल ,केंद्र संचालक अर्जुन जी घुगल , नागपूर राज्य उत्पादन शुल्क चे माजी पोलीस अधीक्षक सुरेंद्र मनपिया, शशिकांत डेलिकर , संचालक मोहन देशमुख ,केंद्र सहसंचालक जगन्नाथ गराट ,सलाई चे सरपंच उत्तम धराडे ,संचालक हर्षवर्धन देशमुख,

माजी प्राचार्य वासुदेव निंघोट,कृष्णा भाल ,पंचम चौधरी, देवेंद्र अवथरे, अमोल येनगड,प्रकाश गराट, संदीप गवई,विशाल दीक्षित व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, सामाजिक वनीकरण विभाग, देवलापार यांचे कडून सर्व फळझाडे निःशुल्क प्राप्त झाली.या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी सर्व लागवड केलेल्या फळ झाडांची देखभाल व संगोपन करण्याचा संकल्प केला,

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: