Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | सेंट्रल जेलमध्ये फटाकासदृश्य बॉम्बचा स्फोट...

अमरावती | सेंट्रल जेलमध्ये फटाकासदृश्य बॉम्बचा स्फोट…

दोन पैकी एक फुटला. एकाचा स्फोट झाला नाही

अमरावती – दुर्वास रोकडे

अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोन मानवनिर्मित फटाक्यांसारखे बॉम्ब फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यातील एक बॉम्ब फुटला, तर दुसरा स्फोट झाला नाही. हे दोन्ही बॉम्ब सुपर एक्सप्रेस हायवेच्या बाजूने फेकण्यात आल्याचा अंदाज कारागृह प्रशासन आणि तपास अथधिकार्यांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जेलर कीर्ती चिंतामणी, डीसीपी सागर पाटील, एसीपी कैलास पुंडकर, एसीपी (गुन्हें) शिवाजीराव बचाटे बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी पोहोचले.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे कारागृहात सर्व काही शांत होते. सर्व कैदी आपापल्या बराकीत विश्रांती घेत होते. नियमित डयूटीवर तैनात असलेले सैनिक कारागृहात गस्तीवर होते. दरम्यान, 6 आणि 7 क्रमांकाच्या बैरेकसमोर फटाक्यासारख्या बॉम्बचा स्फोट होताच कारागृहात एकच खळबळ उडाली.

तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना आपत्कालीन माहिती देण्यात आली. माहिती मिळताच फ्रेजरापुरा पोलीस ठाण्याचे अधिकार्यासह सीपी, जेलर, डीसीपी, एसीपी, बॉम्बशोधक पथकासह अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कारागृह प्रशासन आणि पोलीस अधिकार्यांनी तात्काळ कारवाई करत खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहाच्या आत आणिआणि बाहेर शोधमोहीम सुरू केली.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्ी, जेलर, डीसीपी यांनी कारागृहात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब शोधक पथकाने दोन्ही बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. बॉम्ब स्निफर पाठक यांनी प्रथमदर्शनी त्याचे वर्णन फटाखा सदृश्य बॉम्ब असे केले आहे. त्यामध्ये असलेली बारुद ही फटाख्याची असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. या संदर्भात रविवारी शहरातील सर्व फटाके व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

अशा फटाक्यांची विक्री कोणत्या दुकानातून होते, या दिशेने पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त नरवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यासारखे बॉम्ब हे सुपर एक्सप्रेस हायकवेच्या दिशेने फेकण्यात आले होते. कारागृहातील सर्व सीसीटीव्ही कॅमेन्यांची तपासणी करण्यात येत आहे. कोणी फेकले ? का फेकायचे ? यामागचा हेतू काय, अशा अनेक प्रश्नंची उत्तरे शोधण्यात पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: