अकोला – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेयेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलेय. तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जातीये. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.
या हल्ल्यात अकोल्यातील एक जवान शहीद झालाय. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला आहेय. जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरल आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झालाय. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालंये. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहेय.
शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्याबद्दल आणखी अतिरिक्त माहिती :
चार महिन्यांपूर्वीच आले होते सुट्टीवर
प्रवीण जंजाळ चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. या सुटीत त्यांचा विवाह झाला होता. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली.
प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.