Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस : पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस : पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे.

यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे [email protected] या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: