Thursday, December 26, 2024
Homeगुन्हेगारीमेडशी येथे गाय चोरताना दोन वाहने जप्त, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार,...

मेडशी येथे गाय चोरताना दोन वाहने जप्त, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार, पोलिसांची धाडसी कार्यवाही…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मेडशी तसेच परिसरात मागील दशका पासून गोवंश चोरी जाण्याच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.गावात तसेच परिसरात मधील कोणाच्या तरी कोठ्यातिल शेतातील गाय,बैल,म्हशी,बकऱ्या चोरी जाता होत्या.मात्र चोरटे काही सापडत नव्हते. त्यामुळे पशुपालक हाताश झाले होते. पोटच्या लेकराप्रमाणे स्वतःची जनावरचा सांभाळ करणारे अचानक कोट्यातील दुभते जनावरे शेताचे उपयोगी बैल किंवा बकऱ्या या चोरीला जात होत्या.

आणि चोरटे सुद्धा सापडत नव्हते. त्यामुळे काहींनी तर आपली जनावरे विकून मोकळे झाले. तर काहींनी जनावरांच्या कोट्यातच झोपणे सुरू केले होते.मात्र मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार काल रात्री पोलिसांना दोन संशयित वाहने रात्रीच्या सुमारास फिरताना आढळली.सदर वाहांनावर पोलिसांना संशय आला असता त्याचा पाठलाग करताना पोलिसांनी केला. मात्र चोरट्यांनी पोलिसांची गाडी पाठलाग करत आहे पाहताच धूम स्टाईल पळ काढला.

मात्र मेडशी पोलिसांनी लोखंडी खिळ्याची ट्रीप रोडवर लावून सर्वप्रथम वाहन पंचर केले.पुढे सावरखेड येथील टोलनाक्यावर बॅरीकेट सुद्धा लावण्यात आले होते.मात्र वाहन पंचर होऊन सुद्धा चोरट्यांनी बॅरीकेट तोडत धुम ठोकला होता.सदर चोरट्यांच्या वाहनांचा पाठलाग करत असताना पोलिसांचे वाहन सुद्धा पंक्चर झाले होते. मात्र जीवांची पर्वा न करता पोलिसांनी सुद्धा सदर वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करत पातूरच्या घाटात अडवले.

मात्र अंधाराचा फायदा घेत दोन्ही वाहनातील अंदाजे पाच ते सहा आरोपी जंगलाच्या दिशेने पळाले असले तरी पोलीस कर्मचाऱ्यांना एक तवेरा क्र MH 04 ES 581 व एक इंडिका क्र MH 04 GD 2303 व त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची गावरान जतीची गाय असा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.प्रसार आरोपींचा तपास करून पोलीसच्या वतीने लवकरात लवकर त्यांना शोधून अटक करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.

कालच्या झालेल्या धाडसी कार्यवाही मध्ये मालेगांव ठाणेदार संजय चौधरी सह,पोलिस निरीक्षक रहाटे,वाहन चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल डोईफोडे, मेडशी पोलिस चौकीचे जमदार निलेश अहिर, अमोल पवार, केशव गोडघासे ह्यांनी पार पाडली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: