नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :- विदर्भ विकास मंडळाच्या स्विय सहायक चित्रा मेश्रे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारी लघुलेखक संघटनेतर्फे नागपूर जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सरकारी लघुलेखक संघनेचे नागपूर जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनेचे सचिव डॉ. सोहन चवरे होते.
यावेळी चित्रा मेश्रे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना चित्रा मेश्रे यांनी महसुल विभागांतर्गत विविध विभागात काम करतांना केवळ सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सेवेच्या सूरुवातीला भंडारा जिल्हाधिकारी यांचे स्विय सहायक त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात विविध शाखेत ईमारदारीने कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनेचे सचिव डॉ. सोहन चवरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, दिवसेंदिवस लघुलेखक संवर्ग कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. केवळ न्यायालयीन कामकाज पुरते मर्यादित न राहता सर्व प्रशासकीय विभगात आपल्या पदाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. लघुलेखक या संवर्गाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व महत्व वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
समारंभाचे अध्यक्ष संतोष वानखेडे यांनी लघुलेखक संवर्ग हा शासन सेवेतील कणा असून वरिष्ठ अधिकारी आणि जनतेमधील दुवा म्हणून आपली भूमिका वठवित असतो त्यामुळे हे जबाबदारीचे पद असल्याचे प्रतिपादन केले. संघटनेचे पदाधिकारी प्रदिप गणोरकर, महेश पवार, विनायक कोवे, शालीनी गवई आदिनी मनोगत व्यक्त करुन चित्रा मेश्रे यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्तांचे स्विय सहायक प्रदिप गणोकर, जिल्हाधिकारी यांचे स्विय सहायक संजय गिरी, सेवकराम निमजे, अपर आयुक्तांचे स्विय सहायक रविंद्र वरंभे, मनरेगा आयुक्तांचे स्विय सहायक महेश पवार, व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक यांचे स्विय सहायक प्रशांत मोहोड, महसुल उपायुक्तांचे स्विय सहायक गजानन भोपाळे, अपर जिल्हाधिकारी यांचे स्विय सहायक संजीवनी मेश्राम, सुबोध सहारे, शालीनी गवई आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्विय सहायक मिथुन चांदोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत मोहोड यांनी केले.