बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात ‘गणित’ विषयाची अट शिथील; सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा द्वारे पत्रपरिषदेत माहिती…

0
81
Mrs. Vasudhatai Deshmukh College of Food Technology

आता पी.सी.बी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेश…

अमरावती – सुनील भोळे

नुकताच बारावीचा व सीईटी चा निकाल घोषीत झाला असून विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण प्रवेशाकरीता धावपळ सुरू आहे. प्रामुख्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता यावा या जाणीवेतून राज्य शासनाने योग्य वेळी योग्य व अचुक निर्णय घेतला आहे. या नविन निर्णयानुसार बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात ‘गणित’ विषयाची अट शिथील करीत असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत झाले आहे.

राज्यशासनाच्या कृषी मंत्रालयातर्फे पारीत झालेल्या निर्णयानुसार आता फिजीक्स, केमेस्ट्री व बॉयलॉजी म्हणजेच पी.सी. बी ची सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांकरीता आनंदाची | बाब ठरली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बी.टेक फुड टेक्नॉलाजी अभ्यासक्रम भवितव्य घडविणास इच्छूक विद्यार्थी ज्यांनी पी.सी.बी / पी.सी.एम / पीसीएमबी / जनरल सायन्स ची सीईटी / जेईई परीक्षा उत्तीर्ण केली असे सर्व विद्यार्थी सदर अभ्यासक्रम प्रवेशाकरीता पात्र ठरले आहेत.

अमरावती जिल्ह्याचा विचार करता राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा येथे प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची पर्वणी ठरणार असल्याची माहीत आयोजीत पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी पत्रपरिषदेला अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा अमरावती चे प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख, प्रा. डॉ. रूपाली देशमुख, प्रा. उदय| देशमुख,………..आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रमसाफल्य फाऊंडेशन द्वारा संचालीत सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रपरिषदे मध्ये प्रा. उदय देशमुख यांनी राज्य शासनाच्या नवीन निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगीतले की, सदर सुधारीत निर्णय नवीन वाटत असला तरी २०१६ पुर्वी या अभ्यासक्रमासाठी ‘गणित’ विषयाची अट आणि सीईटी प्रवेश परीक्षेची अट नव्हती. त्यामुळे पूर्वी फुड टेक्नोलॉजी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मोठ्या प्रमाणावर राहत होती.

२०१६ नंतर कृषी अभ्यासक्रमातील बी-टेक टेक्नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमात ‘गणित’ विषयाची अट लागू करीत फिजीक्स, केमेस्ट्री, गणित म्हणजेच पी.सी.एम सीईटी लागु करण्यात आली. वास्तविक पाहता दरवर्षी फिजीक्स, केमेस्ट्री आणि बॉयलॉजी (पी.सी.बी) चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असल्याने गणित विषयाची अट हजारो विद्यार्थ्यांना फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमापासून वंचित ठेवणारी होती. या संदर्भात विना अनुदानीत कृषी व कृषी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालय व अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांच्या के.के वाघ अग्रीकल्चर असोसिएशन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या माध्यामातून मागील ७ वर्षांपासून या अभ्यासक्रमातील गणित विषयाची त्रुटी सुधारण्यावर अथक परिश्रम घेत होते.

राज्य कृषी मंत्रायलाशी निवेदन, भेटी व संवाद साधून फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील गणित विषयाची अट शिथील करण्यावर भर देत यश प्राप्त केले. परिणामी राज्य शासनाच्या सुधारीत | निर्णयानुसार २०२४- २५ शैक्षणिक वर्षापासून फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात गणित विषयाची अट शिथील झाल्याने आता अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील असंख्य विद्यार्थी ज्यांनी पी. सी. बी / पी.सी.एम/ पी.सी.एम.बी / जनरल सायन्स शाखेची सीईटी / जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांकरीता सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा उज्वल भवितव्य साकारण्याकरीता एक सक्षम पर्याय ठरले आहे.

| यानंतर प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांनी जिल्ह्यातील एकमेव सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाबाबत अभ्यासपुर्ण व प्रेरणादायी वाटचालीची माहिती दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्नीत सौ. वसुधाताई देशमुख महाविद्यालयाची स्थापना २००५ मध्ये बडनेरा शहराजवळ असलेल्या पाळा गाव परिसरात झाली. आजतागयात या महाविद्यालयातून जवळजवळ १५ बॅचेस द्वारे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

महाविद्यालयातील तज्ञ व प्रशिक्षीत प्राध्यापक वर्ग सातत्यपुर्ण शैक्षणिक व रोजगारभिमुख उपक्रम राबवित येत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची रोजगार व स्वयंरोजगाराची क्षमता इतर कुठल्याही शाखेपेक्षा अधिक ठरली आहे. प्रा. डॉ. रूपाली देशमुख यांनी सांगितले की, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आज शासकीय व औद्योगिक क्षेत्रात प्रतिष्ठीत पदावर कार्यरत आहेत. प्रामुख्याने याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ. किर्तीराज गायकवाड आयआयटी रूडकी, उत्तराखंड येथील औद्योगिक संस्था येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून केमिकल इंडस्ट्रीज असासिएशन लंडन द्वारे ट्रॅव्हल रिसर्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बायोडिग्रेबल प्लास्टीक या विषयात संशोधन करणारे डॉ. किर्तीराज गायकवाड जागतिक स्तरावर दुसरे व एकमेव भारतीय ठरले आहेत, ही बाब महाविद्यालयास समस्त अमरावतीकरांसाठी गौरवास्पद आहे.

एवढेच नव्हे तर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याच शिक्षणाच्या आधारे स्वतःचा उद्योग थाटला असून अनेकांना रोजगार देत आहेत. चार वर्षांच्या फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम दरम्यान महाविद्यालय स्तरावर सातत्याने अनेक शैक्षणिक व रोजगारभिमुख उपक्रम राबविण्यात येत असल्याने येथील विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य साकाराण्याची संधी शैक्षणिक कालावधीमध्येच प्राप्त होत असते. राज्यशासनाने फुड टेक्नॉलॉजी शाखेचे महत्व व विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य लक्षात घेत गणित विषयाची अट शिथील केली. याबाबत सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाने राज्य शासनाचे व राज्य कृषि मंत्रालयाचे आभार व्यक्त करीत आहे. सदर पत्रपरिषदेला सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा येथील प्रा. . वर्ग उपस्थित होते.

  • योग्य निर्णयाचे अभिनंदन, आभार : मा. वसुधाताई देशमुख

कृषी शिक्षणातील व्यवसायिक व शंभर टक्के रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून अन्नतंत्रज्ञान अभ्यासक्रमाची ख्याती आहे. खाद्य उत्पादन व संशोधन संलग्न या शिक्षणाच्या माध्यामातून शेतीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत शेतकरी वर्गाच्या विकासाला चालना मिळते. राज्य शासनाने या अभ्यासक्रमाचे महत्व लक्षात घेत गणित विषयाची अट शिथील करून बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील नवोदीत संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधनाला तसेच त्यांच्या उज्वल भवितव्याला एक सक्षम मार्ग दिला आहे. या सकारात्मक परिवर्तनाकरीता अथक परिश्रम घेणारे के.के वाघ अग्रीकल्चर असोसिएशन चे अध्यक्ष श्री. समीर वाघ, विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. साळुंखे सर, सदस्य श्री क्षीरसागर साहेब यांचेसह महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद संचालक मंडळ व राज्य कृषी मंत्रालयाचे आभार व्यक्त करीत अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय पाळा अमरावतीच्या अध्यक्षा, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी योग्य निर्णयाचे अभिनंदन करीत आहे.

  • यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा

सौ. वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय २००५ पासून विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल प्रेरणादायी राहीली आहे. बी.टेक फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाद्वारे आजवर असंख्य विद्यार्थ्यांना शासकीय, औद्योगिक व स्वयंरोजगारामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रामुख्याने श्रीरंग खडसे याची याच शिक्षणाच्याआधारावर भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्त झाली आहे. डिवायएसपी सारंग कुर्वे, आशिष नांलदे टेक्नीकल ऑफीसर फुड सेफ्टी अँड ऑथॉरेटी ऑफ इंडिया पदावर आहे. या सारखे असंख्य विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचा व अमरावती जिल्ह्याचा लौकीक वाढवला आहे.

केवळ नोकरीच नव्हे तर सर्वाधिक विद्यार्थ्यांनी बी.टेक फुड अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतःचा उद्योग स्थापन करीत अनेकांना रोजगार दिला आहे. यामध्ये पंकज चव्हाण, जुही उजवणे, सागर रामगावकर, श्याम राऊत, सागर राऊत, वैभव देशमुख, अमन अग्रवाल यांची यशोगाथा समाजाला व विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. फुड टेक्नॉलॉजी एकमेव अशी शाखा ठरली आहे ज्यामध्ये शंभर टक्के रोजगार व उद्योगाद्वारे उज्वल भवितव्य साकारता येते.

  • येत्या १० वर्षात ९० लाख रोजगार

देशात आगामी १० वर्षांमध्ये अन्न प्रक्रीया उद्योगात ९० लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज सीआयआयने व्यक्त केला आहे. १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते. दरवर्षी या उद्योगात एक लाखापेक्षा जास्त अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता आहे. त्याकरीता बी.टे फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरीता एक सक्षम पर्याय ठरला आहे.