नरेंद्र खवले
मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व 7/12 धारक, आपणास सुचित करण्यात येते की आपल्यापैकी बरेच जण यांनी मूर्तिजापूर तालुक्यामध्ये प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत. तसेच काहीजण खदानधारक आहेत आणि ते अकोला अमरावती किंवा बाहेरगावी राहतात. मात्र अशा लोकांकडे अजूनही महसूलची थकबाकी आहे. ज्यांनी महसूलची थकबाकी पुढील सात दिवसात भरणे केली नाही त्यांचे सातबारा व बोजा चढवण्याची प्रक्रिया महसूल विभागातर्फत सुरू होणार आहे.
बोजा चढवल्यानंतर आपल्याला त्या प्लॉटची विक्री करता येणार नाही आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणास त्यावर बँकेचे लोन सुद्धा मिळणार नाही. जर आपल्यावर जास्त वसुली थकीत असेल तर सदर जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुद्धा महसूल विभागातर्फे सुरु होणार आहे.
आपणावर ही कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांना सूचना आहे की, आपण तात्काळ आपल्या तलाठ्याशी संपर्क साधून आपल्याकडे थकीत असलेल्या वसुलीचा भरणा करावा. अन्यथा होणाऱ्या कारवाईस आपण स्वतः जबाबदार राहणार.. उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर