Saturday, December 21, 2024
Homeराज्यअमरावती महानगरपालिका आयुक्‍तपदी सचिन कलंत्रे रुजु...

अमरावती महानगरपालिका आयुक्‍तपदी सचिन कलंत्रे रुजु…

अमरावती – महानगरपालिकेत आयुक्‍तपदी सचिन कलंत्रे मंगळवार २ जुलै,२०२४ रोजी रुजु झाले. विभागप्रमुखांच्‍या बैठकीत माजी आयुक्‍त देविदास पवार यांनी आयुक्‍त सचिन कलंत्रे यांना पुष्‍पगुच्‍छ देवून त्‍यांचे स्‍वागत केले. कायद्याच्‍या चाकोरीत राहून नागरीकाच्‍या समस्‍या लोकप्रतिनिधीचे प्रश्‍न गतीमान पध्‍दतीने पुर्ण करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.

आपण सर्वांनी एक नव्‍या उर्जेने गतीमान काम करणे अपेक्षित आहे. शिस्‍त, गती आणि चांगली कामगिरी या तीन गोष्‍टीवर प्रत्‍येकाने कार्य करावे, अशी अपेक्षा मा. आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी व्‍यक्‍त केले. आयुक्‍तांनी यावेळी अधिका-यांचा ओळख परिचय जाणून घेतला. प्रत्‍येक अधिका-यांने आपल्‍या विभागाचे कामकाजाविषयी माहिती दिली.  

यावेळी माजी मनपा आयुक्‍त देविदास पवार यांना निरोप समारंभ देण्‍यात आला. आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी पुष्‍पगुच्‍छ देवून त्‍यांचा सन्‍मान केला. माजी आयुक्‍त देविदास पवार यांनी यावेळी सर्व सहका-यांनी मला सहकार्य केले. अनेक कामे यावेळी मार्गी लागले. अमरावती शहर हे महाराष्‍ट्रातील चांगल्‍या शहरात गणल्‍या जाते याठिकाणी काम करतांना चांगला अनुभव आला.   

शहर स्‍वच्‍छ आणि सुंदर करण्‍याकडे महापालिकेचा भर राहील. महापालिकेच्‍या आर्थिक स्‍त्रोत बळकट करण्‍याची ग्‍वाही मा.आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी दिली. यावेळी त्‍यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. विविध सामाजिक संघटनेनी यावेळी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. मनपा अधिकारी वर्गाने व पत्रकार बंधूंनी त्‍यांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मनपाचे नवनियुक्त आयुक्त सचिन कलंत्रे यांनी बोलतांना सांगितले आहे.

शहरातील सर्वच भागात स्वच्छता होणे आवश्यक आहे. तसेच नाल्यांची स्वच्छता, अंतर्गत रस्ते यासह नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे, त्या गरजांची पूर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. हे काम करताना काही निर्णय घ्यावे लागतील, ते निर्णय काहींसाठी कटू असतील, तरीही घेऊ मात्र नागरिकांचे समाधान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी असेल तर ती वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील. यासोबतच बाह्यस्रोतात शासनाकडून मिळणारा निधी हा महत्त्वाचा घटक आहे. तो अधिकाधिक आणून शहर विकास कसा साध्य करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. नागरिक कर देतात, त्यामुळे त्यांना प्राथमिक सुविधा देणे हे मनपाचे कर्तव्य आहे. असे असतानाही नागरिकांना सुविधा मिळत नसेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व अमरावतीकरांचे सहकार्य आम्हाला गरजेचे आहे आणि ते मिळेल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, विधी अधिकारी श्रीकांतसिह चव्‍हाण, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, 

उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, अग्निशमन अधिक्षक अजय पंधरे,  प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनिल चौधरी, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, नितीन बोबडे, लक्ष्‍मण पावडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, श्‍याम चावरे, पत्रकार बंधू, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: