राज्यात शासनाने कितीही गुटखा बंदी केली तरी राज्यातील अनेक शहरात सर्रास गुटखा विक्री होते, अमरावती शहरातही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमरावती शहरात गुटखा महाग झाला असल्याने गुटखा शौकिनाच्या खिशाला चांगलीच झळ पोहचत आहे तर अचानक गुटखा का महाग झाला या विषयी महाव्हाइस न्युज च्या टीमने केल्या सर्व्हे नुसार मोठा धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती नव्हे तर अवघ्या विदर्भात गुटखा पोहचवणारा गुटखा किंग याने व्यवसाय बंद केल्यामुळे गुटखा महाग झाला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आहे.
तर गुटखा माफिया याने गुटखा व्यवसाय का बंद केला त्याचे कारणही समोर आले आहे. अमरावतीमध्ये गुटखा माफिया कोण आहे हे सर्वानाच माहिती आहे. त्याच्या डोक्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा हाथ होता हेही सांगण्याची गरज नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गुटखा माफिया ज्या समुदायाचा आहे, त्या समुदायाने लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाला मतदान केले नसल्याने गुटखा माफियांचा व्यवसाय बंद केला असल्याचा प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर गेल्या काही वर्षापासून पोलिसांनी अमरावती शहरात गुटखा पकडल्याची घटना आठवत नाही. या माफियाचे एवढं पोलिसांवर वरदस्त होते. मात्र एका राजकीय नेत्याचा लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभव जिव्हारी लागल्याने त्याचा राग गुटखा माफियावर काढल्या गेल्याचे समजते.
गुटखा माफियाने व्यवसाय बंद केल्यामुळे अनेकांचं दानापाणी बंद झाल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे, यामधे पोलीस,काही पत्रकार सुध्दा आहे. हा माफिया सामाजिक कामात मोठा अग्रेसर आहे. एखाद्याला मदत करण्यात तो कधीही मागे पुढे न बघता सढळ हाताने मदत करायचा मात्र आता त्याने हात वर केल्याने पैसे मागणाऱ्यांची मोठी गोची झाली आहे.