विविध योजनांची घेतली माहिती…
शेतकर्यांना त्वरित लाभ देण्याची केली मागणी…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) खरीप हंगाम सन २०२३-२४ ला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. त्यातच रब्बी हंगामातील धानाची खरेदी अद्याप पूर्ण झालेली नाही. तर परिणामी पावसाच्या खेळखंडोबाणे खरीप हंगामही लांबणीवर पडला आहे. या अनुसंघाने जिल्हा परिषद बांधकाम सभापती तथा भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजयसिंह टेंभरे यांनी राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभागात जावून संबंधित अधिकार्याशी चर्चा करून योजनांचा आडावा घेवून पंचनामा केला.
तसेच शेतकर्यांना कृषी विभागामार्फत देण्यात येणार्या योजनांचा लाभ द्यावा तसेच समस्यांचे निराकरण त्वरित करावे असे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हांगामाला सुरूवात झाली आहे. जून महिला लोटत चालला तरी अनेक शेतकरी कृषी विभागाच्या योजनापासून वंचित आहे. ही बाब हेरून सभापती टेंभरे यांनी आज कृषी विभागात जावून आढावा घेतला. सन २०२३-२४ मध्ये मानव विकास योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला. किती तालुक्याचा समावेश करण्यात आला.
योजनांची टक्केवारी किती या शिवाय गोपीनाथ मुंडे अपघात योजना सन २०२३-२४ चे किती प्रकरण निकाली काढले. जिल्ह्यात आतापर्यंत आलेले खत बियाणे किती, पिक विमा, २०२३-२४ मध्ये महाडिबीटीवर निकाली काढलेल्या प्रकल्पाची संख्या र्स्माट प्रकल्प, आत्मा व सेंद्रीय शेती कार्यक्रम शिवाय पीएम किसान योजनेअंतर्गत किती लाभार्थी वंचित राहिले, भाऊसाहेब फुंडकर योजनेचे लाभार्थी अश्या विविध योजनेची माहिती घेवून कृषी विभागाला चांगलीच धारेवर धरले.
तसेच चालु खरीप हंगामात शेतकर्यांना कृषी योजनांचा पुरेपूर लाभ मिळावा व त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे असे स्पष्ट निर्देश सभापती टेंभरे यांनी दिले. विशेष म्हणजे कृषी विभागाचे सभापती यांचे या विभागाकडे झालेले दुर्लक्ष चर्चेत आले असून जि.प.च्या बांधकाम सभापतीला कृषी विभागाचा आढावा घ्यावा लागत आहे.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी मंगेश वावधने यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान खरीप हंगामात रासायनिक खत, बियाणे, किटकनाशके यासह कोणत्याही समस्यांची अडचण निर्माण होवू देणार नाही. अशी ग्वाही कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.