Gold Price Today: आज 27 जून 2024 रोजी शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाले तर आज मोठी वाढ दिसून आली. त्याचवेळी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज म्हणजेच 27 जून 2024 रोजी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 26 जून रोजी चांदीच्या दरात 1000 रुपयांची घट झाली होती.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली
प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 250 रुपयांनी कमी झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा दर 66,000 रुपयांऐवजी 65,750 रुपये झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 270 रुपयांनी कमी झाला असून 72,000 रुपयांऐवजी 71,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीची नवीनतम किंमत 90,000 रुपये प्रति 1 किलो आहे. तुमच्या शहरात सोन्याचा प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा प्रति 1 किलोचा भाव काय आहे ते जाणून घेऊया?
देशाच्या महत्वाच्या शहरातील दर…प्रति 10 ग्राम सोन्याचे दर
राज्य | Gold Rate (22K) | Gold Rate (24K) |
दिल्ली | 65900 | 71880 |
मुंबई | 65750 | 71730 |
कोलकाता | 65750 | 71730 |
चेन्नई | 66250 | 72280 |
देशाच्या महत्वाच्या शहरातील दर…प्रति 10 ग्राम चांदीचे दर
राज्य | Silver Rate |
दिल्ली | 90000 |
मुंबई | 90000 |
कोलकाता | 90000 |
चेन्नई | 94500 |