तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन…
अकोला – संतोषकुमार गवई
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना परावृत करण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी आज केले.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा लोकशाही सभागृहात झाली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. जगदीश बुकतारे, अन्न व औषध प्रशासनाचे बी व्ही चव्हाण, गिरीश पुसदेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.वारे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे दंतशल्य चिकित्सक यांच्या मदतीने तंबाखूमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहेत तर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समुपदेशकामार्फत धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली तसेच कोटपा कायद्याची अंमलबजावणी करीत प्रत्येक शासकीय व निम शासकीय संस्थानी आपला परिसर तंबाखूमुक्त करावा असे आवाहन डॉ.वारे यांनी केले. यावेळी प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असल्याचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.