Sunday, December 22, 2024
Homeराज्य'स्मार्ट' प्रकल्पांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार...

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार…

कर्ज मंजुरी प्रकरणे निष्कारण प्रलंबित ठेवल्यास फौजदारीचा इशारा…

अकोला – संतोषकुमार गवई

‘स्मार्ट’ प्रकल्पात रास्त कारणाशिवाय कर्ज मंजुरी प्रकरण प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिला. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांचे अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, जिल्ह्यातील बँका व प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) आढावा बैठक येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी प्रकल्पाचे सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. यावेळी स्मार्ट नोडल अधिकारी प्रदिप राऊत, तालुका कृषी अधिकारी शशिकीरण जांभरूनकर अग्रणी बँके उपव्यस्थापक घोरे, राहुल ठाकरे, सबंधित नोडल अधिकारी कृषी अधिकारी आदी उपस्थीत होते.

कर्जाच्या माध्यमातून निधी उभारणी साठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून बँकांकडे 1 वर्षाहून अधिक कालावधी होऊनही अद्याप कर्ज मंजुरी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले याबाबत जिल्हाधिकारी यांनी सबंधित बँकाना 15 दिवसात कर्ज मजुरी प्रकरणे निकाली न निघाल्यास संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: