अकोला – संतोषकुमार गवई
जि. प. उपकरातून सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी 90 टक्के अनुदानावर कृषी साधने पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यानी दि. 10 जुलैपर्यंत पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले आहे.
योजनेनुसार सर्वसाधारण शेतकऱ्याना 90 टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप, सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर ग्रेडर, प्लास्टिक ताडपत्री 450 जीसीएम, बॅटरी ऑपरेटेड पॉवरस्प्रेअर पंप, सोलर- विद्युत झटका मशिन तार कुंपण आदी साधने पुरविण्यात येतील. त्यासाठी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.