रामटेक – राजू कापसे
रामटेक :- आपण आधुनिक जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे अनेक रोगांना आमंत्रण देतो, आणि या रोगांपासून बिना औषधी मुक्ती मिळवायची असेल तर भारतातील अति प्राचीन योगा चिकित्सा पद्धती खूप महत्त्वाची आहे. आणि सूर्यनमस्कार अतिशय महत्त्वाचा आसन आहे..
प्रत्येकाने दिवसात पंधरा मिनिटे काढून जरी सूर्यनमस्कार घातले तरी तो निरोगी राहू शकतो. म्हणून मातृका फौंडेशनने रामटेक द्वारा इंटरनॅशनल योगा दिनानिमित्त महिलांसाठी सूर्यनमस्काराची स्पर्धा 23 जून रविवार 2024 ला , समर्थ कॉन्व्हेंट च्या प्रांगणा, आयोजित करण्यात आली. महिला व मुलींनी याला चांगला प्रतिसाद दिला व स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेच्या परीक्षकांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले.
या स्पर्धेत पहिला क्रमांक महिला गटातून सौ चित्रा वंजारी यांनी पटकावला दुसरा क्रमांक , सौ कोमल कुलरकर, तिसरा क्रमांक ज्योती भोगे. मुलींमधून पहिला क्रमांक कुमारी जानवी मथुरे, दुसरा क्रमांक पूर्वांशी ढोमणे व तिसरा क्रमांक जीविका वंजारी ने पटकावला. या स्पर्धेचे परीक्षक सौ सुवर्णा साकोरे मॅडम, कुमारी शितल उईके यांनी यशस्वीरित्या केले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यास सौ लक्ष्मी माथरे, मेघा वंजारी ,रोहिणी ढोमणे , लता बावनथळे, साक्षी उके यांचा मोलाचा वाटा होता.