न्युज डेस्क – श्री. दादासाहेब गवई चारिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचालित विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापुर येथे स्थित आहे. सदर संस्था हि अखिल भारतीय तंत्राशिक्षण परिषद, नवी दिल्ली तथा MSBTE व DTE या प्राधीकरनाद्वारे २०१० सालापासून मान्यताप्राप्त संस्था आहे.
सध्यास्थितीत तंत्रनिकेतनात एकूण २१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित कार्यरत आहेत. संस्थेद्वारे कर्मचार्यांच्या सेवाशर्तींची पूर्तता होत नसल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी दाखल केलेल्या होत्या परंतु कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे लक्षात येताच तंत्रनिकेतनातील कर्मचारी संघटनेने आपली एकी दाखवत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठ येथे धाव घेतली.
कर्मचार्यांची रिट याचिका जून २०२३ रोजी मा. उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठ येथे दाखल करण्यात आली होती. सूडभावनेने तंत्रनिकेतन व्यवस्थापनाद्वारे पुनःमुलाखती आयोजित करून कर्मचार्यांची सेवा खंडित करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते.
कर्मचार्यांनी मा. उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ येथे नागरी अर्ज दाखल करून सदर बाब हि न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व यावर दिनांक १९ जून २०२४ रोजी मा. न्यायाधीशांनी आदेश पारित केला.
तंत्रनिकेतन व्यवस्थापनाने दिनांक ३.६.२०२४ रोजी घेतलेला पुनःमुलाखतीचा निर्णय कोर्टाने फेटाळला असून सर्व कर्मचार्यांच्या सेवाशर्तींना संरक्षण प्रदान केले आहे ज्यामुळे कर्मचार्यांमध्ये एकच आनंद व्यक्त होत असून,प्रा. मोहित प्रमोदराव गावंडे, अध्यक्ष, विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापुर कर्मचारी संघटना, दारापुर, प्रा. सुकेश ल. कोरडे, उपाध्यक्ष ,श्री. प्रदिप खु. मोहोड, सचिव तथा संघटनेतील समस्त कर्मचारी यांचे संबंध महाराष्ट्रातून कौतुक व्यक्त केल्या जात आहे.