Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | बस मध्ये प्रवासादरम्यान महिलेचे दागिने गेले चोरी..!

मूर्तिजापूर | बस मध्ये प्रवासादरम्यान महिलेचे दागिने गेले चोरी..!

मूर्तिजापूर :- बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना अमरावती- मलकापूर या शिवशाही बस मध्ये प्रवासा दरम्यान घडली आहे. अमरावती वरून मलकापूर ला जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एम. एच ०६ बी. डब्लू ३६६३ मधील साधना इंगळे नामक महिला प्रवाशीच्या बैग मधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याची घटना बडनेरा ते मूर्तिजापूर या प्रवासा दरम्यान घडल्याची घटना गुरवार (दि.२०) रोजी घडली आहे.

आपल्या बैग मधील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच सदर महिलेने वाहकास सांगून बस प्रथम मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला नेण्यास सांगितली. बस मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला येताच सदर घटनेची माहिती महिलेने पोलिसांना देऊन महिला पोलिसांच्या मदतीने बस मधील सर्व प्रवाशांच्या बैग ची तपासणी करण्यात आली. मात्र कुठल्याही प्रवश्याच्या बैग मध्ये चोरीस गेलेले दागिने अथवा रोख रक्कम न मिळाल्याने बस ला पुढील प्रवासाकरिता रवाना करण्यात आले.

सदर महिलेने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला तक्रार देण्याचे म्हणताच पोलीस स्टेशन ला कार्यरत ए. एस. आय तायडे यांनी महिलेस तक्रार देण्याकरिता आपण बडनेरा येथे जाण्याची सल्ला दिली असल्याचे साधना इंगळे यांनी सांगितले. मात्र या सर्व घटने मुळे बस एक तास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला थांबल्याने बस मधील इतर प्रवासी त्रस्त झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: