Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | भाजपच्या जिल्हा महामंत्रिपदी यादव...

रामटेक | भाजपच्या जिल्हा महामंत्रिपदी यादव…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव यांची भाजपच्या नागपूर जिल्हा महामंत्रिपदी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाने ही नियुक्ती केली.

उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव हे – रामटेक तालुक्यातील राजकीय – क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व – आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला पाठबळ मिळेल, अशी आशा – चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

श्री. यादव नियुक्तीबद्दल चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे आभार मानले. श्री. यादव की नियुक्तीबद्दल संजय मुलमुले, आणि विवेक तोतडे, राजेश ठाकरे, प्रशांत किमटकर, बबलू ठाकूर, संजय बिसमोग्रे, उपाध्यक्ष नरेंद्र बंधाटे, जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, सतीश डोंगरे, राजेश जैस्वाल, अनिल कोल्हे, रमेश कुथे, सुधाकर मेंघर, सरपंच रणवीर यादव, मोहन खळगे, मोहन यादव आदी उपस्थित होते.

चंद्रकांत नंदनवार , सोकराज कांभळे , डॉ सुधीर नाखले , फिरोज खान पठाण , नावेद सुलतान ,सुशील रहाटे, रोशन थोटे, सागर लोंढे, प्रज्ज्वल पारधी, सुबोध लोंढे, अनिल कठौते, पंचायत समिती सदस्य पिंकी रहाटे, नीलिमा भगत, अर्चना अमृतकर, शबाना शेख, सरपंच शरद डड्डुरे, सरपंच सुनीता। मिसार, सरपंच विजय भुरे, माजी । सरपंच राजू ठाकूर, मोरेश्वर हिंगे, 1 विठ्ठल पाटील, रितेश झाडे, महेंद्र दिवटे, ऊर्मिला खुडसाव यांनी अभिनंदन केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: