Sunday, December 22, 2024
Homeराज्यसावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌..?

सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌..?

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

या प्रकरणांमध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक शाखेने “कसली कंबर”.

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आपणास सावध होण्याची गरज आहे. विनापरवाना अल्पवयीन वाहनचालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचे जीवदेखील धोक्यात येऊ शकतात. पुणे, नागपूर येथील घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

या प्रकरणांमध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलीस शाखे ने ‘कंबर कसली’ आहे. आगामी काही दिवसांनी शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु होणार असून शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चेतावणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव घुगे यांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नसला तरी त्यांच्याकडून वाहन चालवण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात नाही. वाहतुकीचे नियमांची माहिती नसते. तरी देखील पालकांडून त्यांना वाहन चालवण्यास दिले जाते. मात्र, या वाहन चालकांमुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांसह इतर वाहनधारक व स्वत: अल्पवयीन वाहन चालकांची जीवित हानी व मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोवाका व भा.दं.वि. प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये अकोला शहरातील खदान व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये दोन अल्पवयीन वाहन चालक आढळून आले. त्यांच्या दोन पालकावर गुन्हे नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा व २५ हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही, अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

‘शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाई का करण्यात येऊ नये’..?

“शालेय जीवनातच मुलांना वाहतुकीचे नियम शिकवले जातात. मग शाळेकरी अल्पवयीन मुलांना शाळेत वाहन नआणण्याची जिम्मेदारी जेवढी पालकांची आहे तेवढीच शाळा व्यवस्थापनाचीही आहे. जो विद्यार्थी शाळेत वाहन आणत असेल त्यास वेळीच आळा घालण्याचे कर्तव्य शाळा व्यवस्थापन समितीचे असल्यावर ही शाळेत विद्यार्थी वाहनेवर आणत असतील तर त्या शाळेवरही कारवाई का करण्यात येऊ नये”..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: