अमरावती : नितीन कदम यांनी आपल्या मनोगोताद्वारे व्यक्त केले की बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करण्याकरिता व जनतेच्या आग्रहापोटी मी राजकीय क्षेत्रात वळण घेतले आहे तसेच येथील ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत शैक्षणिक रोजगारात्मक औद्योगिक व सामाजिक प्रश्नांना मार्गी लावण्याकरिता राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सोबतच निराधार महिलांना रोजगार निर्मिती करिता 248 शिलाई मशीन नितीन कदम यांच्या नेतृत्वात वितरित करण्यात आले
त्याचप्रमाणे 10 विद्यार्थ्यांना शालेय वाहतुकीकरिता सायकली प्रदान करण्यात आल्या.
बेरोजगार तरुण तरुणींना नवरोजगाराकरिता 10 अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली युक्त चार चाकी हातगाडी व्यवसायाकरिता प्रदान करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे आठ दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.
यावेळी मुख्य उपस्थिती म्हणून माझी पालकमंत्री तथा मंत्री सुनील भाऊ देशमुख जिल्हाकाँग्रेस पदाधिकारी मिलिंद चिमोटे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नितीन कदम यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 437 युवकांनी रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेतला एवढा प्रचंड प्रमाणात रक्तदान करणारे युवक शहरात पहिल्यांदाच पुढे आल्याचे बोलले जाते.
दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सदस्य व पदाधिकारी यांची हजारोंच्या संख्येने गर्दी येथे बघावयास मिळाली.
एक लक्ष वृक्ष लागवडीचा निर्धार करत नितीन कदम यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमात सुमारे 5000 वृक्ष वितरित करून वृक्ष लागवड चळवळीची सुरुवात करण्यात आली.
संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांचा विजयाचा जयजयकार कार्यक्रमस्थळी दुमदुमला
संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत महिलांची देखील तेवढेच प्रमाणात गर्दी बघावयास मिळाली.
जिल्हा सामान्य रुग्णालय व पंजाबराव रुग्णालय येथील रक्तपेढी विभागातील चमू यांचा विभाग गर्दीसमोर फोल ठरला.
बडनेरा विधानसभा मतदार संघात निवडणूक रणसंग्राम मैदानात उतरणार असल्याचे बिगुल फुंकले
महीला रोजगानिर्मिती करिता आणखी दहा हजार शिलाई मशीन वितरित करण्याचा निर्धार यावेळी नितीन कदम यांनी केला आहे.
एक लक्ष लागवड उपक्रमांतर्गत आज या चळवळीचा श्री गणेशा निधी कदम यांनी 5000 वृक्ष वितरित करून केला.
महीला सक्षमीकरण संकल्पनेतून नितीन कदम यांनी पुढील टप्प्यात दहा हजार महिलांना शिलाई मशीन व इतर माध्यमाद्वारे रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्याची हमी दिली दरम्यान सर्व बाबी दिवाळीपर्यंत पूर्ण होईल असेही यावेळी ते म्हणाले.
शुभेच्छा द्यायला आलेले संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य पदाधिकारी व इतर : – अभिषेक सवाई स्वप्निल मालदुरे नितीन ठाकरे बाबा पाटील सुधीर देशमुख अशोक मिसाळ प्रल्हाद सरोदे संजय चुनकीकर शफी भाई प्रफुल महल्ले तमिज भाई सोपान भटकर पतालिया मुकुंद बांबल राहुल वानखडे उमेश मानकर प्रकाश गोरटे रोशन सनके दीपक भोपसे मोहन भातुकुलकर आकाश पाटील अंकुश मोरे सचिन डहाके सिद्धार्थ बनसोड सतीश भालेराव मच्छिंद्र भटकर सदानंद राठोड अशोक पवार बळीराम राठोड दिनेश जाधव सोनार काका मोहन जाखड नितीन वासनकर पंकज पडोळे गजानन भाऊ रडके विनोद भाऊ मोदी दिनेश खोडके प्रवीण हरमकर संजय शेटे नंदकिशोर शेरे ऋषिकेश काकडे अंकुश धोटे सागर बारब्दे बन्सी लाठी हितेंद्र मेश्राम विवेक सहारे संजोग सूर्यवंशी निखिल सातनूरकर स्वप्निल सातनूरकर आकाश खडसे बंटी रामटेके नितीन काळे किरण गुडधे समीर जवंजाळ वैभव देशमुख नितेश वानखडे निलेश गुहे आकाश गेडाम चेतन काळे सुरज जोशी गोलू बजाज गोलू गिडवाणी इम्रान भाई गजानन खोडे अक्षय भाऊ धुळस सतीश वानखडे उमेश मेश्राम ओम प्रकाश झोड मनीष पवार प्रतीक ढगे सुरज गुल्हाने किशोर घोंगडे आकाश राऊत संदेश खंडारे