Sunday, December 22, 2024
Homeराज्य"आपला आमदार आपल्या गावी" उपक्रमा अंतर्गत पिपरीया गावाला आ. आशिष जयस्वाल यांची...

“आपला आमदार आपल्या गावी” उपक्रमा अंतर्गत पिपरीया गावाला आ. आशिष जयस्वाल यांची भेट…

शासनाच्या विविध योजनांचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार – आ. आशिष जयस्वाल

रामटेक – राजु कापसे

शासनाच्या विविध योजनांचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक,कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी रामटेकचे आमदार ऍड. आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या गावी” या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दि.१५ जुन २०२४ रोजी ग्राम पंचायत पिपरीया अंतर्गत पिपरीया गावाला भेट दिली.

यावेळी रामटेक पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते,गट विकास अधिकारी जयसिंग जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे,पोलिस निरिक्षक राजेश पाटील, माजी सभापती संजय नेवारे, ग्राम पंचायत सरपंच प्रविण उईके,माजी सरपंच शेखर खंडाते, शिवकुमार कोकोडे,उपसरपंच भिमराव वाळके, पोलिस पाटील कमल हिरकणे ,रविंद्र उईके, ग्राम पंचायत सदस्य काजल धूर्वे, आचल कोडापे, शोभा डोंगरे,प्रिती उईके,सूर्यभान ईडपाची, अशोक उईके सह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पिपरीया गावात गेल्यानंतर आमदार आशिष जयस्वाल यांनी प्रथमतः गावकऱ्यांशी संवाद साधला. अत्यंत आपुलकीने त्यांनी प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करीत नेमकी समस्या काय हे समजून घेतले.

यात रेशन कार्डबाबत ४५ नावे, आधार नोंदणी/दुरुस्ती करिता प्राप्त २४ नावे, विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्याकरिता प्राप्त ९५ नावे ,घरकूलाचा लाभ मिळण्याकरिता प्राप्त १३२ नावे,मतदार नोंदणसाठी प्राप्त ५१ नावे, बांधकाम कामगार नोंदणी करिता प्राप्त ९१ नावे, ई श्रम नोंदणी १८ नावे , आयुष्यमान भारत करीता प्राप्त ३७ नावे,आभा कार्ड २४ नावे आदी समस्या गावकऱ्यांनी मांडल्यावर आमदार जयस्वाल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगून यांची कामे कशी तातडीने होतील यासंदर्भात निर्देश दिले.

” आपला आमदार आपल्या गावी ” या उक्रमातून लोकांची कामे अवघ्या काही मिनिटांत होत असल्याने समाधान मिळत असल्याच्या भावना व्यक्त करीत पिपरीया गावातील ग्रामस्थांनी आमदार आशिष जयस्वाल यांचे आभार मानले आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: